Bipul Sharma: IPL चॅम्पियन बिपुल शर्माने भारतीय क्रिकेटला ठोकला रामराम, आता अमेरिकन लीगमध्ये खेळणार

Bipul Sharma News: डाव्या हाताचा फिरकीपटू बिपूल शर्माने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. बिपुल शर्मा आता अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळणार आहे.

डाव्या हाताचा फिरकीपटू बिपूल शर्माने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. बिपुल शर्मा आता अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळणार आहे.

बिपुल शर्माच्या आधी उन्मुक्त चंद यानेही असा निर्णय घेतला होता. आता त्याच्या प्रमाणेच बिपुल शर्माही अमेरिकी लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

बिपुल शर्माने आयपीएलमध्ये पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केलं होतं. तसेच २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता.

बिपुल शर्माने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने ए.बी. डिव्हिलियर्सची विकेट घेतली होती. अखेरीस या सामन्यात हैदराबादने ८ धावांनी विजय मिळवला होता.

बिपुल शर्मा पंजाब, हिमाचल प्रदेश, सिक्कीम या संघाकडून खेळला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याने ५ हजार ८३५ धावा काढल्या आहेत. तसेच ३०६ बळी टिपले आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ८ शतके फटकावली आहेत. तर लिस्ट एमध्ये त्याने एक शतक ठोकले आहे.