ICC Awards Winners Full List : बेन स्टोक्सला सर्वोच्च मान, पाहा ICC Awardsची संपूर्ण यादी एका क्लिकवर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) 2019च्या वर्षाच्या पुरस्कारांची बुधवारी घोषणा करण्यात आली. आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे आणि कसोटी संघाचे नेतृत्व टीम इंडियाच्या विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेननं 2019च्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जिंकला. लाबुशेननं 2019मध्ये कसोटीत पदार्पण केले आणि त्यानं 11 कसोटी सामन्यांत 64.94च्या सरासरीनं 1104 धावा केल्या.

स्कॉटलंडच्या कायले कोएत्झर यानं संलग्न संघटनांमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्यानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धा आणि वन डे क्रिकेटमध्ये 48.88च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

भारताच्या दीपक चहरनं 2019मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार पटकावला. त्यानं बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात हॅटट्रिकसह 7 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यना स्टीव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांना सज्जड दम भरला होता. त्याच्या या कृतीला सर्वाधिक पसंती मिळाली होती आणि आयसीसीनं या कृतीला स्पिरीट ऑफ क्रिकेट या पुरस्कारानं गौरविले.

2019मधील वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार टीम इंडियाचा हिटमॅन रोहीत शर्मानं पटकावला. रोहितनं यंदाच्या वर्षात वर्ल्ड कप स्पर्धेतील 5 शतकांसह एकूण 7 शतकी खेळी केल्या. त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 2019मध्ये 28 सामन्यांत 57.30च्या सरासरीनं 1490 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं कसोटीतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. त्यानं 2019मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 59 विकेट्स घेतल्या.

आयसीसीनं जाहीर केलेल्या वन डे संघाचे नेतृत्व कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. या संघात रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी स्थान पटकावले आहे. याशिवाय वेस्ट इंडिजचा शे होप, पाकिस्तानचा बाबर आझम, न्यूझीलंडचा केन विलियम्सन, इंग्लंडचा बेन स्टोक्स व जोस बटलर ( यष्टिरक्षक), ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांचाही समावेश आहे.

आयसीसीच्या कसोटी संघात विराटसह मयांक अग्रवालनं स्थान पटकावले आहे. या संघात टॉम लॅथम, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, बीजे वॉटलींग, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नील वॅगनर, नॅथन लियॉन

यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार बेन स्टोक्सनं नावावर केला. स्टोक्सनं यंदाचं वर्ष खऱ्या अर्थानं गाजवलं. इंग्लंडला वन डे वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टोक्सनं कसोटीतही आपला दबदबा राखला. अॅशेस मालिकेतील त्याची चिवट खेळी अविस्मरणीय ठरली. त्यामुळे त्याला यंदाची सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी देण्यात आली.