Join us  

सानियापूर्वी एका भारतीय मुलीसोबत Shoaib Malik ने थाटलेला संसार; कोण आहे आयेशा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 1:05 PM

Open in App
1 / 6

सानियासोबत त्याच्या नात्यात तणावाच्या चर्चा मागील १-२ वर्षांपासून सुरू होत्या. पण, दोघांकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. त्यात सानियाने काही दिवसांपूर्वी शोएबसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आणि आज अचानक क्रिकेटपटूने पाकिस्तानी अभिनेत्री साना जावेद ( Sana Javed) हिच्यासोबत लग्नाचे फोटो पोस्ट केले.

2 / 6

सानियाच्या आधी शोएबने आणखी एका भारतीय मुलीसोबत लग्न केलं होतं आणि सानियासोबतच्या लग्नाच्या एकदिवसआधी त्याने तिच्याशी घटस्फोट घेतला होता. सानिया व शोएब यांचा १२ वर्षांचा संसार अखेर मोडला. पण, शोएब मलिक याच्या आयुष्याबाबत यापूर्वी चर्चा रंगली होती.

3 / 6

सानियासोबत लग्न करण्यापूर्वी शोएबचं आणखी एक लग्न झालं होतं आणि त्या महिलेचं नाव आयेशा सिद्दीकी ( Ayesha Siddiqui ) असे आहे. आयेशा, जिला महा सिद्दीकी या नावाने देखील ओळखले जाते.

4 / 6

आयेशा ती व्यवसायाने शिक्षिका होती आणि ती देखील हैदराबादची होती. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेता शोएब सानियाशी लग्न करणार असल्याचा आरोप करण्यात आला होता.

5 / 6

आयशाने शोएबविरुद्ध फसवणूक केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यात तिने २००२ मध्ये शोएबसोबत लग्न झाल्याचे उघड केले होते आणि पुरावा म्हणून त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओ क्लिपही शेअर केल्या होत्या.

6 / 6

तिने सांगितले की तिला फक्त शोएब मलिकपासून घटस्फोट घ्यायचा होता आणि नंतर असे उघड झाले की तिला पाकिस्तानी क्रिकेटरकडून १५ कोटी रुपये पोटगी म्हणून देखील मिळाले. सानियाशी लग्नाच्या काही दिवस आधी शोएबला आयेशाकडून घटस्फोट मिळाला.

टॅग्स :शोएब मलिकसानिया मिर्झाऑफ द फिल्ड