Join us  

IND vs PAK : टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध 'भगव्या' जर्सीत खेळणार? BCCIचे खजिनदार आशिष शेलार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 4:53 PM

Open in App
1 / 6

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत खेळवला जात असलेल्या सामन्यात भारताने पकड घेतली आहे आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ११९ धावांत तंबूत पाठवला आहे. पण, सर्वांना प्रतीक्षा आहे ती, भारत-पाकिस्तान लढतीची...

2 / 6

वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने कालच्या विजयासह गुणतालिकेत फेरबदल केले. न्यूझीलंडने वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवून २.१४९ नेट रन रेटसह अव्वल स्थान पटकावले.

3 / 6

पाकिस्तानने नेदरलँड्सला नमवून १.६२० नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती, परंतु आफ्रिकेने आज १०२ धावांनी विजय मिळवला. त्यांच्या या विजयाने त्यांचा नेट रन रेट हा २.०४० इतका झाला अन् ते दुसऱ्या क्रमांकावर आले. पाकिस्तान तिसऱ्या व बांगलादेश १.४३८ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

4 / 6

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया वेगळी जर्सी घालू शकते, असे वृत्त समोर आले आहे आणि आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठे अपडेट दिले आहेत.

5 / 6

२०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ निळ्या जर्सीव्यतिरिक्त आणखी एक जर्सी घातली होती आणि तसाच प्रयोग यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये होण्याचे वृत्त समोर आले आहे. भारताने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्तानला ७ वेळा पराभूत केले आहे. पाकिस्तानला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला एकदाही हरवता आलेले नाही.

6 / 6

दरम्यान, भारतीय संघाला मोठा विजय मिळवून यात फेरबदल करण्याची संधी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीबाबत आलेल्या मीडिया रिपोर्टवर बीसीसीआयचे सचिव आशिष शेलार म्हणाले, भारत पाकिस्तानविरुद्ध पर्यायी जर्सी घालणार असल्याच्या मीडिया रिपोर्ट्स आम्ही स्पष्टपणे फेटाळून लावतो. हे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. भारतीय संघ याच सामन्यात नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेत निळ्या जर्सीतच खेळणार आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआय