BCCI च्या वार्षिक करारात युवा खेळाडूंचे प्रमोशन; रहाणे-अय्यरसह अनेकांचे डिमोशन

BCCI central contracts: बीसीसीआयने २०२३-२४ ची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे.

बीसीसीआयने २०२३-२४ ची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. युवा यष्टिरक्षक इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंनी नुकतेच देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता.

रोहित शर्मा, विराट कोहली A+ श्रेणीत कायम आहेत तर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना त्यांच्या करारातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे पुजारा-रहाणे या दोघांचे डिमोशन झाले.

तर, अनेक युवा खेळाडूंना करारात प्रमोशन मिळाले आहे. A+ श्रेणीमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तर अ श्रेणीमध्ये आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्या नावाचा समावेश आहे.

ब श्रेणीमध्ये सूर्यकुमार, रिषभ पंत, कुलदीप, अक्षर आणि यशस्वी जैस्वाल यांना स्थान मिळाले आहे. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना करारातून वगळण्यात आले आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा ग्रेड ए+ श्रेणीत आहेत, तर आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या ग्रेड ए श्रेणीत आहेत.

मराठमोळा खेळाडू ऋतुराजला क श्रेणीत स्थान मिळाले आहे. जे खेळाडू किमान ३ कसोटी किंवा ८ वन डे सामने अथवा १० ट्वेंटी-२० सामने खेळण्याच्या निकषांची पूर्तता करतात त्यांना प्रमाणित कालावधीत आपोआप क श्रेणीमध्ये सामाविष्ट केले जाईल.

निवड समितीने आकाश दीप, विजयकुमार विशक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा या खेळाडूंसाठी कराराची शिफारस केली आहे. A+ श्रेणीमध्ये ४, अ श्रेणीमध्ये ६, ब श्रेणीमध्ये ५ आणि क श्रेणीमध्ये १५ खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

तसेच ग्रेड सी मध्ये रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांना स्थान मिळाले आहे.

करारानुसार, रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, केएस भरत, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा यांसह काही युवा खेळाडूंचे प्रमोशन झाले आहे.

खरं तर करारानुसार खेळाडूंच्या मानधनाचा आलेख हा ७, ५, ३ , १ कोटी असा आहे. पण बीसीसीआयने उल्लेख केलेला नाही. या रकमेत वाढ होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.