BBL 2021-22: मॅक्सवेल-स्टोयनिसचे वादळ! २९ चौकार, ११ षटकार, कुटल्या २७३ धावा, पण अवघ्या ६ धावांनी वर्ल्ड रेकॉर्ड हुकला

Maxwell-Stoinis in BBL 2021-22: बिग बॅश लीग २०२१-२२ मध्ये आज षटकार चौकारांची अशी बरसात झाली की ही फटकेबाजी पाहून क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आज खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील ५६ व्या सामन्यामध्ये मेलबोर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सने गोलंदाजांची अशी धुलाई केली की धावफलकावर २० षटकांमध्ये २७३ धावा लागल्या. मेलबोर्न स्टार्सकडून कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करताना ६४ चेंडूत नाबाद १५४ धावा कुटल्या.

बिग बॅश लीग २०२१-२२ मध्ये आज षटकार चौकारांची अशी बरसात झाली की ही फटकेबाजी पाहून क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आज खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील ५६ व्या सामन्यामध्ये मेलबोर्न स्टार्सने होबार्ट हरिकेन्सने गोलंदाजांची अशी धुलाई केली की धावफलकावर २० षटकांमध्ये २७३ धावा लागल्या. मेलबोर्न स्टार्सकडून कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळी करताना ६४ चेंडूत नाबाद १५४ धावा कुटल्या.

ग्लेन मॅक्सवेलबरोबरच मार्कस स्टॉयनिसनेही ३१ चेंडूत ७५ धावांची खेळी केली. त्याबरोबरच मेलबोर्न स्टार्सने बिग बॅश लीगच्या इतिहासामधील सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली. मात्र २७३ धावा बनवल्यानंतरही मेलबोर्न स्टार्सला टी-२०मधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवता आली नाही.

मेलबोर्न स्टार्सला या मोठ्या धावसंख्येपर्यंत कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने पोहोचवले. त्याने केवळ ४१ चेंडूत शतकी खेळी केली. शतक पूर्ण केल्यानंतरही तो थांबला नाही. मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजी करताना १५० धावांचा टप्पा ओलांडला. बिग बॅशच्या इतिहासामध्ये १५० धावांचा टप्पा ओलांडणारा मॅक्सवेल हा पहिला खेळाडू बनला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक २७८ धावा फटकावण्याचा विश्वविक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे. अफगाणिस्तानने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता. त्यानंतर चेक रिपब्लिकनेही २०१९ मध्ये टर्कीविरुद्ध २० षटकांत २७८ धावा जमवल्या होत्या. त्यामुळे आता मेलबोर्न स्टार्स हा संघ सर्वाधिक धावा फटकावण्याच्याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे.

मेलबोर्न स्टार्ससाठी ग्लेन मॅक्सवेलने मार्कस स्टॉयनिससोबत मिळून ५४ चेंडूत १३२ धावांची भागीदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान २३ चेंडूत ५४ धावांचे होते. तर स्टॉयनिसने ३१ चेंडूत ७५ धावा कुटल्या.