Join us  

'हे' आहेत शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार ठोकणारे वीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 12:15 PM

Open in App
1 / 7

निदहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकनं षटकार ठोकला आणि टीम इंडियानं थरारक विजय साकारला. शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. सगळ्यांच्या नजरा सौम्या सरकार आणि दिनेश कार्तिकवर खिळल्या होत्या. पण, कार्तिकचा इरादा पक्का होता. त्याने जराही न डगमगता हवेत उडवलेला चेंडू सीमेपलीकडे जाऊन पडला आणि भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला. अशाच प्रकारे, शेवटच्या चेंडूवर षटकार हाणून विजय मिळवून देण्याची किमया दिनेश कार्तिकआधी सहा जणांनी केली आहे. पाहू या कोण-कोण आहेत हे वीर...

2 / 7

१८ एप्रिल १९८६. ऑस्ट्रेलेशिया कपच्या जेतेपदासाठी भारत - पाकिस्तान आमनेसामने. पाकला शेवटच्या चेंडूवर हव्या होत्या ४ धावा. त्यावेळी जावेद मियांदाद यांनी चेतन शर्माच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि भारताचं विजयाचं स्वप्न भंगलं.

3 / 7

२२ डिसेंबर २०१२. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामना. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची गरज असताना इयान मॉर्गनने अशोक डिंडाचा चेंडू हवेतून सीमेपार धाडला आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला.

4 / 7

२०१३ मध्ये न्यूझीलंडच्या नॅथन मॅकलमनं श्रीलंकेच्या रंगना हेराथच्या चेंडूवर षटकार ठोकून विजय साकारला होता. किवींना शेवटच्या चेंडूवर एकच धाव हवी होती, पण आक्रमक मॅकलमने दे धम्माल सिक्सर लगावली.

5 / 7

२६ मार्च १९९९. न्यूझीलंड विरुद्ध द. आफ्रिका सामना. नॅशच्या शेवटच्या चेंडूवर चार धावा हव्या असताना लान्स क्लूसनरने जबरदस्त षटकार खेचला आणि चोकर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आफ्रिकेनं निःश्वास सोडला.

6 / 7

२००६ मध्ये झिम्बाम्बे विरुद्ध बांगलादेश यांच्यातील वनडे सामन्यात ब्रँडन टेलर स्टार ठरला होता. शेवटच्या तीन चेंडूत १६ धावांची गरज असताना एक चौकार आणि दोन षटकार खेचून त्यानं विजयश्री खेचून आणली होती.

7 / 7

वेस्ट इंडीजच्या शिवनारायण चंद्रपॉलने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून विजय मिळवण्याची किमया केली होती. चामिंडा वासच्या चेंडूवर त्यानं खणखणीत सिक्सर लगावली होती.

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८दिनेश कार्तिक