Join us  

सहकारी खेळाडूच्या लग्नात गेला, त्याच्याच मेहुणीवर लट्टू झाला; क्रिकेटपटूची भन्नाट लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 3:46 PM

Open in App
1 / 7

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मुशफिकर रहीमची प्रेमकथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखी आहे. मुशफिकर रहीम त्याचा सहकारी खेळाडू महमुदुल्लाहच्या लग्नात गेला होता. तिथे तो महमुदुल्लाहच्या मेहुणीच्या प्रेमात पडला.

2 / 7

बांगलादेशचा विकेटकीपर-फलंदाज मुशफिकर रहीमची प्रेमकहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. मुशफिकर मित्राच्या लग्नाला गेला होता आणि तिथे त्याची नजर त्याच्या मित्राच्या भावी पत्नीच्या बहिणीशी भिडली. दोघांचे संभाषण सुरू झाले आणि त्यानंतर प्रेमकहाणी सुरू झाली.

3 / 7

मुशफिकर रहीमची प्रेमकहाणीही अशीच आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दोन द्विशतके झळकावणारा मुशफिकर रहीम हा इतिहासातील पहिला यष्टिरक्षक-फलंदाज आहे. मैदानावर विकेटच्या मागे फलंदाजांना यष्टीचीत करणारा मुशफिकर स्वत: आपल्या सहकारी खेळाडूच्या मेहुणीला पाहून यष्टीचीत झाला.

4 / 7

बांगलादेशी क्रिकेटर मुशफिकर रहीम आणि त्याची पत्नी जन्नतुल किफायत यांच्या पहिल्या भेटीची कहाणी खूपच रंजक आहे. दोघांची पहिली भेट लग्नात झाली होती. मुशफिकर रहीम त्याचा सहकारी क्रिकेटर महमुदुल्लाहच्या लग्नाला गेला होता. २०११ ची गोष्ट आहे आणि या लग्नातच जन्नतुल किफायतला पाहून मुशफिकर पहिल्या नजरेतच प्रेमात पडला.

5 / 7

जन्नतुल किफायतची बहीण जन्नतुल कावसार मिश्ती हिचे महमुदुल्लाहसोबत लग्न होत होते. म्हणजे जन्नतुल किफायत ही महमुदुल्लाह रियादची मेहुणी बनली होती. आपल्याच सहकारी क्रिकेटरच्या मेहुणीला पाहून मुशफिकर प्रेमात पडला. मुशफिकरने लग्नातच जन्नतुल किफायतशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न यशस्वीही झाला.

6 / 7

लग्नाच्या पहिल्या भेटीनंतर मुशफिकर रहीम आणि जन्नतुल किफायत एकमेकांना डेट करू लागले. मुशफिकर रहीम आणि जन्नतुल किफायतने दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१३ मध्ये साखरपुडा केला. एका वर्षानंतर त्यांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी लग्न केले.

7 / 7

२०१८ मध्ये मुशफिकर रहीम आणि जन्नतुल किफायत एका मुलाचे पालक झाले. जन्नतुलला बॉलिवूड चित्रपट आणि गाणी खूप आवडतात. जन्नतुल किफायत ढाका विद्यापीठातून बिझनेस स्टडीजमध्ये पदवीधर आहे. ती मूळची बांगलादेशातील बोगरा शहरातील आहे.

टॅग्स :बांगलादेश
Open in App