IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरला संधीच मिळणार नाही; भारताच्या दिग्गजाने त्यामागचं कारणही सांगितलं

नेमकं काय म्हणाला आर. अश्विन? जाणून घ्या सविस्तर

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू आर. अश्विन याने आयपीएल २०२६ आधी अर्जुन तेंडुलकर संदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे.

लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यात मयंक यादव, माहसिन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी हे जलदगती गोलंदाज आहेत. त्यामुळे अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकत नाही. असे स्पष्ट मत अश्विने मांडले.

अर्जुन तेंडुलकर हा २०२१ पासून मुंबई इंडिन्सच्या संघाचा भाग होता. पण २०२३ मध्ये त्याला IPL मध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

पाच वर्षात अर्जुन तेंडुलकरनं फक्त MI च्या संघाकडून फक्त ५ सामने खेळले असून यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत.

नव्या संघाकडून त्याला किती संधी मिळणार? आता तरी तो धमक दाखवणार का? ही चर्चा रंगत असताना आर अश्विनयाने LSG मध्येही अर्जुन तेंडुलकरची अवस्था MI सारखीच होईल, असा दावा केल्याचे दिसते.

MI चा संघातून रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील LSG संघात आल्यावर तरी अर्जुन तेंडुलकरला अधिकाधिक संधी मिळणार का? अशी चर्चा रंगत असताना आर. अश्विन याने या ऑलराउंडरला संघात स्थानच मिळू शकत नाही, असे म्हटले आहे.

अर्जुन तेंडुलकरला वगळत अश्विनने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिषभ पंत आणि मिचेल मार्शला सलामीवीराच्या रुपात पसंती दिली आहे.