Join us  

विराट कोहलीच्या सत्कारानं भावुक झाली अनुष्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 12:15 PM

Open in App
1 / 9

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने ( DDCA) गुरुवारी फिरोज शाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून दिवगंत अरुण जेटली स्टेडियम असे केले. याच सोहळ्यात स्टेडियममधील एका स्टॅण्डला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आहे.

2 / 9

2001साली याच स्टेडियमवर भारतीय क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफसाठी कोहली धावाधाव करायचा आणि आज त्याच स्टेडियमवरील स्टॅण्डला कोहलीचे नाव देण्यात आले.

3 / 9

30 वर्षीय विराटच्या नावावार 20000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

4 / 9

या सोहळ्याला विराटसह पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. पतीचं कौतुक होताचा पाहून तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते.

5 / 9

भारतीय संघातील सदस्यही या सोहळ्याला उपस्थित होते. त्यात शिखर धवन, रिषभ पंत, कृणाल पांड्या, लोकेश राहुल, मनिष पांडे, हार्दिक पांड्या यांचा समावेश होता.

6 / 9

कोहलीनं या सत्काराप्रसंगी DDCAचे आभार मानले. तो म्हणाला,''एवढी प्रमुख माणसं या सोहळ्याला उपस्थित असल्याचे पाहून दडपण आले होते. इतका भव्यदिव्य सोहळा मलाही अपेक्षित नव्हता. DDCAचे अध्यक्ष आणि संघातील उपस्थित सदस्यांचे आभार. दिल्लीचे सर्व माजी खेळाडू त्यांचेही आभार.''

7 / 9

तो म्हणाला,''या सोहळ्यासाठी घर सोडताना मी कुटुंबीयांना 2001च्या एका प्रसंगाची आठवण करून दिली. 2001 साली येथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात कसोटी सामना खेळला गेला होता. आम्ही पेव्हेलियन स्टॅण्डच्या शेजारी बसलो होतो. युवराज सिंग, जवागल श्रीनाथ बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत होते. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेलो मी त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागत होतो. त्यावेळी कधी असा विचारही केला नव्हता की, त्याच स्टेडियमवरील स्टॅण्डला आपले नाव दिले जाईल.''

8 / 9

9 / 9

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मादिल्ली