IND vs AUS Memes: "क्यों हिला डाला ना...", रवींद्र जडेजाने 5 बळी घेताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

ravindra jadeja: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे.

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. आज या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची भारतीय गोलंदाजांनी कंबर मोडली. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनला 3 बळी घेण्यात यश आले.

भारतीय संघात मोठ्या कालावाधीनंतर पुनरागमन केलेल्या जडेजाने कांगारूच्या संघाला मोठे धक्के दिले. जडेजाच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

रवींद्र जडेजाने पहिल्या सामन्याच्या पहिल्याच डावात 22 षटकांत 47 धावा देऊन 5 बळी घेत भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. ज्यानंतर 'सर जडेजा' सोशल मीडियावर हिरो झाला आहे.

पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या पहिल्या डावात 63.5 षटकांत 177 धावा केल्या. भारताकडून जडेजाने (5), अश्विनने (3) तर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

कांगारूच्या संघाकडून मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथ 37 धावांची साजेशी खेळी करून तंबूत परतला.

लक्षणीय बाब म्हणजे लाबूशेन आणि स्मिथ या दोघांनाही रवींद्र जडेजाने बाहेरचा रस्ता दाखवला.

रवींद्र जडेजाने शानदार पुनरागमन केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत असून चाहते मीम्स व्हायरल करत आहेत.