"आदिपुरुष' पाहिल्यानंतर मला कळलं की...", सेहवागचं विधान अन् प्रभासचे चाहते संतापले

Virender Sehwag on Adipurush : आदिपुरूष चित्रपट सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

आदिपुरूष चित्रपट सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सनॉन यांची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे.

अनेक नेटकऱ्यांनी भारतीय महाकाव्य रामायण हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे दाखवले असल्याचे म्हणत चित्रपटाची खिल्ली उडवली. तर विविध संघटनांनी आदिपुरूषवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याआधीही अनेक चित्रपटांना विरोध झाला आहे.

पण, हिंदू-मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन धर्माचे लोकही अभिनेता प्रभासच्या चित्रपटाची खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो.

सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या आदिपुरूष चित्रपटावरून सेहवागने एक ट्विट केले. सेहवागने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "आदिपुरुष'ला पाहिल्यानंतर मला कळले की कट्टप्पाने बाहुबलीला का मारले होते."

या ट्विटवरून नेटकरी वीरूला जोरदार ट्रोल करत आहे. सेहवागला प्रभासचे चाहते ट्रोल करत असून भारतीय खेळाडूची खिल्ली उडवत आहेत.

एका युजरने लिहिले, "मित्रा, आठवडाभरानंतरही जोक कॉपी केलास." तसेच सेहवागचा एक जुना फोटो शेअर करत एकाने म्हटले, "तुला पाहिल्यानंतर मला समजले की लोक धर्माचा तिरस्कार का करू लागतात."

वीरेंद्र सेहवागने आदिपुरुषबद्दल केलेल्या विधानामुळे बाहुबली फेम प्रभासचे चाहते प्रचंड संतापले आहेत आणि अनेकजण सेहवागबद्दल अपमानास्पद भाषा वापरत आहेत.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आणि पहिल्या तीन दिवसात जगभरात ३०० कोटी रुपयांची कमाई केली, परंतु तेव्हापासून चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घसरण होत आहे.

बाहुबली फेम प्रभास, अभिनेत्री क्रिती सनॉन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरूषने चाहत्यांना भुरळ घातली. पण विविध राजकीय पक्षांचा विरोध यामुळेच चित्रपट जास्त चर्चेत राहिला.

आदिपुरूषने शुक्रवारी २३ जून रोजी प्रदर्शित झाल्याच्या आठव्या दिवशी सर्व भाषांमध्ये केवळ ३.४० कोटी रुपयांची कमाई केली.