Flashback 2022: 2022 मध्ये 'या' क्रिकेपटूंच्या घरात झालं नव्या पाहुण्याचं आगमन; 6 भारतीय खेळाडू झाले 'बाप'

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि त्याची अभिनेत्री-पत्नी हेजल कीच 25 जानेवारी 2022 रोजी एका मुलाचे पालक झाले.

मयंक अग्रवाल - भारतीय संघाचा खेळाडू मयंक अग्रवाल या वर्षाच्या अखेरीस एका मुलाचा बाप झाला. मयंकची पत्नी आशिता सूद हिने मुलाला जन्म दिला आहे. मयंकने पत्नी आणि मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. मयंक आणि आशिता हे 9 डिसेंबर रोजी पालक झाले. मयंक अग्रवालने जून 2018 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण आशिता सूदशी लग्न केले होते.

अजिंक्य रहाणे - भारतीय संघाचा मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुसऱ्यांदा बाप झाला. रहाणेची पत्नी राधिका हिने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव राघव ठेवण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी 5 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांना मुलगी झाली जिचे नाव आर्या असे आहे.

युवराज सिंग - भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग या वर्षाच्या सुरूवातीला बाप झाला. युवराजची पत्नी हेजल कीचने 25 जानेवारी 2022 रोजी एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव ओरियन ठेवण्यात आले आहे. युवराज आणि हेजलचे लग्न 30 नोव्हेंबर 2016 रोजी झाले.

ॲडम झाम्पा - ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू ॲडम झाम्पा जून 2022 मध्ये पहिल्यांदा बाप झाला. 30 वर्षीय खेळाडूने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली.

स्टुअर्ट ब्रॉड - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि त्याची गर्लफ्रेंड 25 नोव्हेंबर 2022 रोजी एका मुलीचे पालक झाले. त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे, मात्र या दोघांचे अद्याप लग्न झाले नाही. त्यामुळे ब्रॉड लग्नाच्या आधीच बाप झाला आहे.

केन विल्यमसन - न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसनने 22 मे 2022 रोजी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून सांगितले की, तो दुसऱ्यांदा पिता बनला आहे. त्याची पत्नी सारा रहीम हिने एका मुलाला जन्म दिला. विल्यमसन 2020 मध्ये पहिल्यांदा पिता बनला होता.

कार्लोस ब्रॅथवेट - यावर्षी वेस्ट इंडिजचा क्रिकेटर कार्लोस ब्रॅथवेटच्या घरीही नवा पाहुणा आला आहे. कार्लोस ब्रॅथवेट पहिल्यांदाच पिता झाला. त्यांच्या घरी एका मुलीचे आगमन झाले आहे.

शिवम दुबे - भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे 13 फेब्रुवारी 2021 रोजी बाप झाला. त्याची पत्नी अंजुम खान हिने एका मुलाला जन्म दिला.

क्रुणाल पांड्या - क्रुणाल पांड्या 24 जुलै 2022 रोजी पिता झाला. त्याची पत्नी पंखुडी शर्मा हिने एका मुलाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव कवीर क्रुणाल पांड्या असे ठेवले आहे.

रॉबिन उथप्पा - रॉबिन उथप्पा दुसऱ्यांदा पिता बनला आहे. उथप्पाची पत्नी शीतल हिने मुलीला जन्म दिला आहे. उथप्पाने इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती.