रोहितलाही जे जमलं नाही ते मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमारनं करून दाखवलं!

मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज सूर्यकुमारनं 2019मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजी केली. त्यामुळेच त्याचा भारताच्या ट्वेंटी-20 संघात समावेश करण्यात यावा अशी मागणी होत आहे. सूर्यकुमारनं 2019मध्ये अशा विक्रमाला गवसणी घातली, जो विक्रम रोहित शर्मालाही करता आलेला नाही. कॅलेंडर वर्षातखेळलेल्या ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 40+ सरासरी आणि 145+च्या स्ट्राईक रेटनं किमान 1000 धावा करणाऱ्या फलंदाजांत सूर्यकुमारनं स्थान पटकावलं. विशेष म्हणजे भारताकडून विराट कोहली, सुरेश रैना आणि रिषभ पंत यांनाच अशी कामगिरी करता आलेली आहे. जाणून घेऊया या यादीत कोणाकोणाला आहे स्थान...

माहेला जयवर्धने ( 2010) 32 सामन्यांत 1156 धावा ( 2/100 व 8/50) 41.28ची सरासरी व 152.7चा स्ट्राईक रेट

सुरेश रैना ( 2010) 29 सामन्यांत 47.36ची सरासरी व 149.71च्या स्ट्राईक रेटनं 1042 धावा. त्यात 1 शतक व 8 अर्धशतकांचा समावेश

ख्रिस गेलनं अशी कामगिरी चारवेळा केली आहे. 2011मध्ये त्यानं 31 सामन्यांत 1497 धावा ( 57.57 सरासरी आणि 174.67 स्ट्राईक रेट), 2012 मध्ये 40 सामन्यांत 47.87ची सरासरी आणि 151.68च्या स्ट्राईक रेटनं 1532 धावा, 2013 मध्ये 33 सामन्यांत 1344 व 2015मध्ये 36 सामन्यांत 1665 धावा

केव्हीन पीटरसनने 2015मध्ये 26 सामन्यांत 48.57च्या सरासरीनं आणि 164.52च्या स्ट्राईक रेटनं 2 शतकं व 7 अर्धशतकांसह 1020 धावा केल्या.

विराट कोहलीनं 2016मध्ये 31 सामन्यांत 1614 धावा केल्या. त्याची सरासरी 89.66, तर स्ट्राईक रेट 147.12 इतका होता.

एबी डिव्हिलियर्सनं 2016मध्येच 30 सामन्यांत 1122 धावा केल्या, एबी डिव्हिलियर्सनं 2019मध्ये 38 सामन्यांत 1339 धावा केल्या

डेव्हिड वॉर्नरनं 2016मध्ये 27 सामन्यांत 1086 धावा

एव्हीन लुईसनं 2017मध्ये 32 सामन्यांत 1124 धावा

अॅरोन फिंचनं 2018मध्ये 39 सामन्यांत 1350 धावा

रिषभ पंतनं 2018मध्ये 32 सामन्यांत 1209धावा केल्या

सूर्यकुमारनं 2019मध्ये 37 सामन्यांत 43.55च्या सरासरीनं आणि 146.26च्या स्ट्राईक रेटनं 1176 धावा केल्या आहेत.