Join us

2020 हे वर्ष खरंच खराब!, Point Table मध्ये RCB अव्वल, तर CSK तळाला!; दिग्गज क्रिकेटपटूचं ट्विट व्हायरल

By स्वदेश घाणेकर | Updated: October 3, 2020 20:44 IST

Open in App
1 / 9

RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात RCBनं सहज बाजी मारली. Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना होता.

2 / 9

युजवेंद्र चहलनं ( Yuzvendra Chahal) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात निराशाजनक कामगिरीनंतर RCBचा डाव देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी सावरला. RCBनं हा सामना सहज जिंकला.

3 / 9

राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. महिपाल लोम्रोर 1 चौकार व 3 षटकारांसह 39 चेंडूंत 47 धावा करून बाद झाला. राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांनी अखेरच्य षटकात हल्लाबोल चढवला अन् RRनं 6 बाद 154 धावा केल्या. टेवाटिया आणि आर्चर यांनी 21 चेंडूंत नाबा 40 धावा चोपल्या. टेवाटियानं 3 षटकार खेचून नाबाद 24,तर आर्चरनं 16 धावा केल्या.

4 / 9

धावांचा पाठलाग करताना RCBचा सलामीवीर आरोन फिंच लगेल माघारी परतला, परंतु युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी दमदार खेळ केला.

5 / 9

देवदत्तानं 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर विराटनेही 41 चेंडूंत 50 धावा केल्या. IPLमधील 8 डावांनंतर विराटनं अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे IPLमधील 37वे अर्धशतक ठरले.

6 / 9

विराट-देवदत्तची 99 धावांची भागीदारी जोफ्रा आर्चरने तोडली. देवदत्त 63 धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराटनं अखेरपर्यंत खिंड लढवून RCBचा विजय पक्का केला.

7 / 9

RCBनं 8 विकेट राखून हा सामना जिंकला. विराट 53 चेंडूंवर 72 धावांवर नाबाद राहिला.

8 / 9

या विजयानंतर RCBने गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्स या यादीत तळाला असल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले.

9 / 9

यावरून न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू स्कॉट स्टायरिस याने ट्विट केले आणि ते व्हायरल झालं आहे. त्यानं लिहिलं की,''2020 हे खरंच खराब वर्षांपैकी एक आहे. RCBसध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावार आहे आणि CSK तळाला.''

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स