Join us  

KL Rahul : लोकेश राहुलला पंजाब किंग्स सोडल्याचा पश्चाताप होणार; BCCIच्या निर्णयानं १ कोटी कमी पगार घेऊन खेळावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:25 PM

Open in App
1 / 7

बीसीसीआयनं अखेर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) नव्यानं दाखल झालेल्या अहमदाबाद व लखनौ या दोन फ्रँचायझींना मान्यता दिली. आता या दोन्ही फ्रँचायझींना २२ जानेवारीपर्यंत त्यांनी करारबद्ध केलेल्या प्रत्येकी ३ खेळाडूंची नावं बीसीसीआयकडे सोपवायची आहेत.

2 / 7

आयपीएलमध्ये आधीपासून खेळणाऱ्या ८ फ्रँचायझींनी त्यांचे रिटेन खेळाडू नोव्हेंबर २०२१मध्येच जाहीर केले आहेत. त्यांनी रिलीज केलेल्या म्हणजेच संघात कायम न राखलेल्या खेळाडूंपैकी प्रत्येकी तीन खेळाडूंना करारबद्ध करण्याची मुभा अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींना आहे.

3 / 7

लखनौ फ्रँचायझी लोकेश राहुलला, तर अहमदाबाद फ्रँचायझी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय राशिद खान, डेव्हिड वॉर्नर, कागिसो रबाडा आदी काही मोठी नावंही या फ्रँचायझींच्या रडारवर आहेत. लखनौ तर लोकेशला २० कोटी देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले होते. असे झाले असते तर लोकेश आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला असता.

4 / 7

पण, आता तसे होण्याची शक्यता फार कमी आहे, उलट लोकेशला १ कोटी कमी पगार घेऊन खेळावे लागेल अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. बीसीसीआयनं अहमदाबाद व लखनौ फ्रँचायझींना प्रत्येकी ३ खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी एक बजेट दिलं आहे आणि त्याचा फटका लोकेशला बसणार आहे.

5 / 7

Cricbuzzनं दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही फ्रँचायझींना प्रत्येकी ३ खेळाडूंसाठी ३३ कोटीचं बजेट दिलं गेलं आहे. त्यातील पहिल्या खेळाडूसाठी १५, दुसऱ्या खेळाडूसाठी ११ आणि तिसऱ्य खेळाडूसाठी ७ कोटी दिले जातील. जर दोन खेळाडू करारबद्ध केले तर पहिल्या खेळाडूला १४ व दुसऱ्या खेळाडूला १० कोटी रुपये मिळतील. अनकॅप खेळाडूला ४ कोटीच पगार मिळेल.

6 / 7

बीसीसीआयच्या रिटेन नियमानुसार जर पंजाब किंग्सनं लोकेशला कायम राखण्याचा निर्णय घेतला, तर त्याला जास्तीत जास्त १६ कोटी मिळू शकले असते. आयपीएल २०१८ पासून लोकेशनं आयपीएलच्या चार पर्वात अनुक्रमे ६५९, ५९३, ६७० व ६२६ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्सनं त्याला ११ कोटींत करारबद्ध केले होते.

7 / 7

संजिव गोएंगा यांच्या RPSG Gproup नं ७०९० कोटी रुपयांची बोली लावून लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आहे आणि ते लोकेशसाठी आग्रही आहेत. पण, आता बीसीसीआयच्या या नियमानुसार लोकेशला १५ कोटीच पगार मिळू शकतो. त्यामुळे त्याला एक कोटीचेच नुकसानच होणार आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुलपंजाब किंग्सअहमदाबाद
Open in App