Only then will Virat Kohli play Test day and night against Australia | ...तरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी खेळू-विराट कोहली
...तरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस-रात्र कसोटी खेळू-विराट कोहली

कोलकाता : ‘पुढीलवर्षी ऑस्ट्रेलियात माझा संघ दिवस- रात्र कसोटी खेळण्यास तयार आहे, मात्र त्यासाठी माझी अट असून सराव सामन्यानंतरच सामन्याचे आयोजन व्हावे,’ असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. भारताने मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस- रात्र कसोटी खेळण्यास नकार दिला होता. आता पुढल्या वर्षीच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कसोटी खेळणार का, असा प्रश्न करताच विराटने ‘होय’ असे उत्तर दिले, पण एक अटही पुढे केली. तो म्हणाला,‘ कसोटीआधी एक सराव सामना आयोजित व्हावा. मागच्या दौऱ्यायात सराव सामना न मिळाल्यामुळेच आम्ही कसोटीस नकार दिला होता.’ ‘आम्ही गुलाबी चेंडूने खेळू इच्छित होतो. आता हा क्षण आला आहे,’ असे विराटने सांगितले. अचानक कसा काय निर्णय घेतला असा प्रश्न करताच विराट म्हणाला, ‘मागील काही वर्षांपासून चर्चा सुरू होती. हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता.’

Web Title: Only then will Virat Kohli play Test day and night against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.