NZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग!

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी खेळाडूंना काही सूचना केल्या आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: November 27, 2020 11:40 AM2020-11-27T11:40:09+5:302020-11-27T11:40:59+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs PAK : Pakistan cricket team’s one more COVID breach could see them getting deported from New Zealand | NZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग!

NZ vs PAK : ... तर तुम्हा सर्वांना देशातून हद्दपार करू; पाकिस्तान टीमला न्यूझीलंड सरकारची वॉर्निंग!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत सराव करण्यावर बंदी न्यूझीलंडमध्ये सध्या ५९ कोरोना रुग्ण आहेत

पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या चर्चेत आहे... त्याला कारण त्यांची मैदानावरील कामगिरी नव्हे, तर मैदानाबाहेरील कृती आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघाचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.  त्या सर्व सहा खेळाडूंना ख्राईस्टचर्च येथील आयसोलेशन विभागात ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी तीन ते चार वेळा कोरोना नियमांचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड सरकारनंच त्यांना तंबी दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघातील एकाही खेळाडूकडून आणखी एकदा आयसोलेशन नियमाचा भंग झाल्यास संपूर्ण संघाला Deported म्हणजेच न्यूझीलंडमधून हद्दपार करण्यात येईल, अशी वॉर्निंग न्यूझीलंड सरकारनं दिली आहे. सध्या त्यांना सराव करण्यापासून रोखण्यात आले आहे. 

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी खेळाडूंना काही सूचना केल्या आहेत. ते म्हणाले,''मी न्यूझीलंड सरकारशी चर्चा केली आणि तुन्ही तीन-चार वेळा आयसोलेशन नियमांचं उल्लंघन केल्याचे, त्यांनी सांगितले. कोरोना नियमासंदर्भात ते कोणताही गलथानपणा खपवून घेणार नाहीत आणि त्यांनी आपल्याला फायनल वॉर्निंग दिली आहे. तुमच्यासाठी ही आव्हानात्मक काळ आहे, हे मी समजू शकतो आणि अशाच परिस्थितीला तुम्ही इंग्लंडमध्ये सामोरे गेला आहात. पण, हा आपल्या देशाच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. १४दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीचे काटेकोर पालन करा आणि त्यानंतर तुम्ही फ्री आहात. आणखी एक चूक आणि ते आपल्याला घरी पाठवतील.'' India Vs Australia : आज दौऱ्याला सुरुवात होणार अन् टीम इंडियासाठी Bad News; प्रमुख गोलंदाजाची माघार

न्यूझीलंडमध्ये सध्या ५९ कोरोना रुग्ण आहेत आणि एक काळ असा आलेला की किवी देशात १०० दिवस एकही रुग्ण सापडला नव्हता. नियमांचं काटेकोर पालन हे यामागचं मुख्य कारण आहे.  अ‍ॅडम गिलख्रिस्टकडून चूक, नेटिझन्सनी फैलावर घेतल्यावर मागितली माफी; नेमकं काय झालं?

रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत सराव करण्यावर बंदी 
पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली तेव्हा त्यातील ६ खेळाडूंचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितले की, या सहामधील २ चाचणी अहवाल जुने आहेत तर ४ नवीन आहे. या खेळाडूंच्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही. या सर्व खेळाडूंना विलगीकरण केंद्रात ठेवलं आहे. पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर तीन T 20 आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी आले आहेत.

सध्या पाकिस्तान खेळाडूंचा सराव थांबवण्यात आला आहे, जोपर्यंत चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत सराव करण्यावर बंदी ठेवली आहे, विलगीकरणाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी टीममधील काही खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन केले, त्यानंतर या खेळाडूंना नियमांची जाणीव करून देत समज देण्यात आली. यापूर्वीही इंग्लंड दौऱ्यापूर्वी पाकिस्तानच्या १० खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. India Vs Australia : 'अदानी'च्या विरोधातील फलक घेऊन प्रेक्षक थेट मैदानावर घुसला अन्....

Web Title: NZ vs PAK : Pakistan cricket team’s one more COVID breach could see them getting deported from New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.