India Vs Australia : Ishant Sharma ruled out of Australia tour, Rohit Sharma still in contention | India Vs Australia : आज दौऱ्याला सुरुवात होणार अन् टीम इंडियासाठी Bad News; प्रमुख गोलंदाजाची माघार

India Vs Australia : आज दौऱ्याला सुरुवात होणार अन् टीम इंडियासाठी Bad News; प्रमुख गोलंदाजाची माघार

ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला आजपासून सुरुवातरोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांच्या फिटनेसबाबत बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्सटी नटराजनचा वन डे संघात समावेश, नवदीप सैनीची दुखापतीनं डोकं वर काढलं

India Vs Australia :  भारतीय संघ तब्बत ८-९ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया रवाना होण्यापूर्वीपासूनच या मालिकेची सर्वांना उत्सुकता होती. त्यात ऑस्ट्रेलियासारख्या कट्टर प्रतिस्पर्धीसमोर खेळताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा 'जोश' आणखी वाढलेला पाहायला मिळतो. तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. पण, तत्पूर्वी टीम इंडियासाठी एक Bad News येऊन धडकली आहे. भारताचा अनुभवी जलदगती गोलंदाजानं माघार घेतली आहे. BCCIनं याची अधिकृत माहिती दिली आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाले. पण, दुखापतीमुळे इशांत शर्मा व रोहित शर्मा हे टीमसोबत जाऊ शकले नाही. हे दोघेही सध्या BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) उपचार घेत आहेत. रोहितच्या दुखापतीबाबत संभ्रमाची अवस्था असल्याचे विराटनं गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मान्य केले. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येईल की नाही, हेही संघ व्यवस्थापनाला माहीत नसल्याचे विराटनं कबुल केले. विराटच्या या विधानानंतर बीसीसीआयनं तातडीनं मीडिया रिलीज पाठवून रोहित व इशांत यांच्या तंदुरुस्तीबाबत अपडेट्स दिले.

''रोहित व इशांत ही दोघंही ऑस्ट्रेलियात संघासोबत का नाहीत, याबाबत मलाही काहीच कल्पना नाही. १७ डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होत आहे आणि ते NCA उपचार घेत आहेत, परंतु ते तत्पूर्वी तंदुरुस्ती होतील की नाही, याबाबतही स्पष्टता नाही,''असे विराट म्हणाला. ही दोघंही पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार असल्याचे आधीच स्पष्ट केले गेले होते. 

बीसीसीआयनं पाठवलेल्या रिलीजनुसार आजारी वडिलांना भेटण्यासाठी रोहित IPL फायनलनंतर मुंबईत परतला. ''रोहित सध्या NCAमध्ये आहे. ११ डिसेंबरला त्याच्या तंदुरुस्तीची पुन्हा चाचणी केली जाईल. त्यानंतर तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेसाठी तंदुरुस्त आहे की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल,''असे BCCIनं सांगितले. त्या रिलीजमध्ये BCCIचे सचिव जय शाह यांनी सांगितले की,''UAEत झालेल्या आयपीएल २०२० दरम्यानच्या साईड स्ट्रेन दुखापतीतून इशांत शर्मा पूर्णपणे बरा झाला होता. कसोटी मालिकेसाठी तंदुरुस्तीसाठी तो सज्ज होत होता, परंतु इशांत शर्मानं आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतून माघार घेतली आहे.'' 


BCCIनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ ऑक्टोबरला टीम इंडियाची घोषणा केली. त्यावेळी रोहित आणि इशांत यांना संघात समावेश केले गेले नाही, परंतु त्यानंतर रोहितचा कसोटी संघात समावेश करण्यात आला.  

Ishant Sharma Injury Timeline 
२९ सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल २०२०मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळला
१२ ऑक्टोबर - दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली
२६ ऑक्टोबर - इशांत पहिल्या कसोटीसाठी तंदुरुस्त होईल असा विश्वास NCAनं व्यक्त केला
९ नोव्हेंबर - कसोटी मालिकेसाठी इशांत तंदुरुस्त होईल, याबाबत BCCI संभ्रमात
१८ नोव्हेंबर - सुनील जोशी व राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली इशांतने गोलंदाजी केली
२२ नोव्हेंबर - कसोटी मालिकेत इशांतचे खेळणे अवघड, तो कसोटीसाठी तंदुरुस्त वाटत नसल्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे विधान
२४ नोव्हेंबर- इशांत पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्याची चर्चा
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India Vs Australia : Ishant Sharma ruled out of Australia tour, Rohit Sharma still in contention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.