NZ vs IND: पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट; कधी पडणार पाऊस जाणून घ्या...

त्यामुळे या मैदानात प्रथम फलंदाजी करणे कठिण समजले जाते. जर पहिल्या दिवशी पाऊस पडला तर कोणत्याही फलंदाजासाठी ती वाट बातमी असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 06:01 PM2020-02-20T18:01:08+5:302020-02-20T18:02:33+5:30

whatsapp join usJoin us
NZ vs IND: Rainfall on first test match; Know when rain comes... | NZ vs IND: पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट; कधी पडणार पाऊस जाणून घ्या...

NZ vs IND: पहिल्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट; कधी पडणार पाऊस जाणून घ्या...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेलिंग्टन - टी-20 मालिकेत भारताने आणि एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर आता दोन्ही संघ कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पाऊस हा खलनायक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वर्चस्व राखून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कामय राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर एकदिवसीय मालिकेनंतर कसोटीतही भारताला धक्का देण्यास यजमान न्यूझीलंडचा संघ उत्सुक असेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात ७० टक्के पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सामन्यामध्ये कधीही पावसाची रिपरिप सुरु होऊ शकते. त्याचबरोबर या मैदानात जोरात वारे वाहू लागतात. त्यामुळे या मैदानात प्रथम फलंदाजी करणे कठिण समजले जाते. जर पहिल्या दिवशी पाऊस पडला तर कोणत्याही फलंदाजासाठी ती वाट बातमी असेल.

दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीची बॅट न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत म्हणावी तशी तळपलेली नाही. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्यास तो उत्सूक असेल. या मालिकेमध्ये तीन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी विराटकडे असेल.  

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रवी शास्त्री झाले भावूक, लिहिला खास मेसेज
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याकसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या दोन्ही देशांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे भावुक झालेले पाहायला मिळाले आहे. शास्त्री यांनी एक मेसेजही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

शास्त्री हे बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल झालेले आहेत. चाहत्यांनी त्यांना बऱ्याचदा डिवचलं आहे आणि त्यांची मस्करीही केली आहे. त्यामुळे बऱ्याचदा शास्त्री हे सोशल मीडियापासून लांब असतात. पण शास्त्री यांनी मात्र ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपले फोटो शेअर केले आहेत आणि त्याचबरोबर एक भावुक मेसेजही लिहिला आहे.

टी-20 मालिकेत भारताने आणि एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर आता दोन्ही संघ कसोटी मालिकेत आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीची बॅट न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत म्हणावी तशी तळपलेली नाही. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करण्यास तो उत्सूक असेल. या मालिकेमध्ये तीन मोठ्या विक्रमांना गवसणी घालण्याची संधी विराटकडे असेल.  

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत वर्चस्व राखून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कामय राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तर एकदिवसीय मालिकेनंतर कसोटीतही भारताला धक्का देण्यास यजमान न्यूझीलंडचा संघ उत्सुक असेल. 

शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, " ३९ वर्षांपूर्वी हेच मैदान, हाच दिवस, हेच प्रतिस्पर्धी होते, जेव्हा मी भारताकडून पदार्पण केले होते." 
 

Web Title: NZ vs IND: Rainfall on first test match; Know when rain comes...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.