No Arjuna award for Dutee Chand, Harbhajan Singh's Khel Ratna application rejected | हरभजन सिंगचा 'खेल रत्न'साठीचा अर्ज फेटाळला, द्युती चंदलाही अर्जुन पुरस्कार नाही
हरभजन सिंगचा 'खेल रत्न'साठीचा अर्ज फेटाळला, द्युती चंदलाही अर्जुन पुरस्कार नाही

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याचा खेल रत्न पुरस्कारासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याच्यासह भारताची स्टार धावपटू द्युती चंद आणि आशियाई पदक विजेता धावपटू मनजीत सिंह यांचाही अर्जुन पुरस्कारासाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. क्रीडा मंत्रालयाने खेल रत्न व अर्जु पुरस्कारासाठीच्या खेळाडूंच्या नावाची यादी तयार केली आहे. ती लवकरच केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली होती. यावर्षी बीसीसीआयनं खेल रत्न पुरस्कारासाठी कोणाचेही नाव पाठवले नाही. पंजाब सरकारने हरभजनच्या नावाची शिफारस केली होती. पण, त्याच्या नावाच्या शिफारसीचा अर्ज 25 जूनला पाठवण्यात आला, परंतु यासाठी 30 एप्रिल ही डेडलाईन होती. 

एक संघटना अर्जुन पुरस्कारासाठी केवळ तीन नावं पाठवू शकते. त्यामुळे द्युतीलाही यंदा पुरस्कारापासून वंचित रहावे लागेल. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने द्युती आणि मनजीत यांच्या व्यतिरिक्त तेजिंदर पाल सिंह तूर, स्वप्ना बर्मन आणि अरपिंदर सिंह यांचे नाव पाठवले होते.
  

Web Title: No Arjuna award for Dutee Chand, Harbhajan Singh's Khel Ratna application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.