Join us  

मृत्यूची पसरलेली अफवा, त्याने दिला जीवंत असल्याचा पुरावा; पण, क्रिकेटपटूला ओळखणंही अवघड

बोर्डासोबत वाद झाल्यामुळे वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 12:36 PM

Open in App

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू हिथ स्ट्रिक ( Heath Streak) याचं वयाच्या ४९ व्या वर्षी कर्करोगानं निधन झाल्याचं काही दिवसांपूर्वी पसरलं होतं. अनेक क्रिकेटपटूंनी श्रंद्धाजलीही वाहिली होती, पण स्ट्रिक जिवंत असल्याचे झिम्बाब्वेच्या संघातील सहकारी हेन्री ओलोंगाने दिलं. स्वत: स्ट्रिकनेच आपण जिवंत असल्याचे मेसेज करून सांगितल्याचा दावा ओलोंगाने केला होता. आता स्ट्रिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, परंतु त्यात स्ट्रिकची अवस्था पाहून चाहते भावूक झाले आहेत. 

स्ट्रिकचं निधन झाल्याचं दु:खद वृत्त हेन्री ओलोंगा याने ट्विट करून दिलं होतं. त्याने नंतर जुनं ट्विट डिलीट करून हिथ स्ट्रिक जिवंत असल्याचा दावा केला आहे. ओलोंगाने नव्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, हिथ स्ट्रिकच्या निधनाची बातमी खूप वेगाने पसरली. मी आताच त्याच्याशी बोललो. तिसऱ्या पंचांनी त्याला परत बोलावलंय. तो खूप मनमोकळा माणूस आहे आणि तो जिवंत आहे.

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार असलेल्या हिथ स्ट्रिकने बोर्डासोबत वाद झाल्यामुळे वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. स्ट्रिकने झिम्बाब्वेकडून ६५ कसोटी आणि १८९ सामने खेळले होते. या दोन्ही प्रकारात मिळून त्याने ४९३३ धावा आणि ४५५ बळी टिपले आहेत. २००५ मध्ये हिथ स्ट्रिकने प्रशिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर त्याने बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. तसेच आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सचा प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम हापिलं होतं.  

टॅग्स :झिम्बाब्वेऑफ द फिल्ड
Open in App