कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली

तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:06 IST2025-06-05T15:05:27+5:302025-06-05T15:06:29+5:30

whatsapp join usJoin us
Yuzvendra Chahal More Unlucky Player In IPL Lost Three Final Different Team | कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली

कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलच्या १८ व्या हंगामात १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर १८ नंबर जर्सीत मिरवणाऱ्या विराट कोहलीला अखेर IPL चॅम्पियनचा टॅग लागला. विराट कोहलीचा आयपीएलमधील प्रवास अन् त्याची जबरदस्त आकडेवारी पाहिल्यावर जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेतील तो अनलकी खेळाडू  ठरतो. पण आता त्याचं स्वप्न साकार झालंय. पण एक खेळाडू मात्र आता त्याच्यापेक्षा अनलकी असल्याचे दिसून येते.  ज्याची यंदाच्या हंगामातील फायनलमध्ये तिसऱ्यांदा IPL ट्रॉफी उंचावण्याची संधी हुकली. आयपीएल कारकिर्दीत कधी त्याला विराटसोबत फायनल खेळताना अपयश आले तर आता विराटच्या संघाविरुद्ध खेळताना त्याच्या पदरी निराशा आलीये.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पंजाबच्या संघाकडून खेळतानाही पदरी पडली निराशा

आयपीएलच्या इतिहासातील विराट कोहलीपेक्षा 'अनलकी' कोण असेल तर तो आहे युजवेंद्र चहल. यामागचं कारण हे की, हा फिरकीपटू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. युजवेंद्र चहल हा यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जच्या ताफ्यातून खेळताना दिसला. १४ सामन्यात एका हॅटट्रिकसह त्याने १६ विकेट्स घेतल्या. पण पंजाब किंग्जचा संघ पहिली ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला. युजवेंद्र चहलनं आपल्या आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचून ट्रॉफी जिंकता आली नाही. 

चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

आधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हरला, मग हॅटट्रिकसह पर्पल कॅप जिंकून ट्रॉफी गमावली 

२०१६ च्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील RCB च्या संघाकडून चहल पहिली IPL फायनल खेळला होता. त्यावेळी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२२ च्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून फायनल खेळला. या हंगामात तर चहलनं हॅटट्रिकसह पर्पल कॅप जिंकली, पण गुजरात टायटन्ससमोर ट्रॉफी जिंकण्याचं त्याचं स्वप्न त्यावेळीही अधुरेच राहिले. आता यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा हॅटट्रिकचा डाव साधूनही पंजाबकडून खेळताना तो ट्रॉफीशिवायच राहिला.

चहलची आयपीएलमधील कामगिरी

२०१३ च्या हंगामात IPL पदार्पण करणाऱ्या युजवेंद्र चहल याने वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना १७४  सामन्यात २२१ विकेट्स घेतल्या आहेत. तो या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. २०२२ च्या हंगामात राजस्थानकडून त्याने एका हंगामात २७ विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकली होती. हॅटट्रिकचा डाव साधताना ४० धावा खर्च करून घेतलेल्या ५ विकेट्स ही त्याची आतापर्यंतच्या कारकर्दीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
 

Web Title: Yuzvendra Chahal More Unlucky Player In IPL Lost Three Final Different Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.