Join us  

Yuvraj Singh's Retirement: युवराजला होती विश्वचषकात खेळण्याची आस, वडिलांनी सांगितली खास गोष्ट

युवराजचे वडिल योगराज यांनी याबाबचा एक खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 9:45 PM

Open in App

मुंबई : प्रत्येक खेळाडूचे आपण देशाकडून विश्वचषकात खेळावे, हे स्वप्न असते. आतापर्यंत युवराज 2007 आणि 2011 च्या विश्वविजयी संघात होता. पण यंदाच्या विश्वचषकातही आपल्याला संधी मिळावी, अशी आस लावून युवराज बसला होता. पण यंदाच्या भारताच्या विश्वचषकाच्या संघात त्याची निवड झाली नाही आणि तो हिरमुसला. युवराजचे वडिल योगराज यांनी याबाबचा एक खुलासा केला आहे.

योगराज म्हणाले की, " युवराज आणि मी एकत्र बसून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या विश्वचषकात युवराजला संधी मिळेल, असे मला वाटत होते. युवराजलाही आशा होती. पण तसे घडले नाही. पण विश्वचषकानंतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची युवराजची इच्छा होती. पण युवराजची ही इच्छा काही जणांमुळे पूर्ण होऊ शकणार नव्हती, असे आम्हाला समजले. त्यानंतर आम्ही निवृत्तीचा निर्णय ठाम केला."

यो-यो टेस्टमध्ये पास झाला होता युवराज, पण...काही भारताच्या खेळाडूंवर अन्याय करण्यात आला. काही खेळाडूंनी तो अन्याय सहन केला, तर काहींनी आपण किती सक्षम आहोत, हे दाखवून बहेरचा रस्ता धरला. युवराज सिंग हा दुसऱ्या प्रकारातला. कारण अन्यास सहन करणं, त्याच्याकडे नव्हतं.

यो-यो टेस्ट पास कर नाहीतर निवृत्तीचा सामना खेळ, असे युवराजला बीसीसीआयला सांगितले होते. त्यानंतर युवराजने यो-यो टेस्ट दिली आणि त्यामध्ये तो पास झाल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर युवराजने बीसीसीआयची ऑफर धुडकावून लावली. एक तर तो यो-यो टेस्टमध्ये पास झाला होता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावर कुणी मेहेरबानी करावी, असे युवराजला वाटत नव्हते. पण यो-यो टेस्ट पास झाल्यावर युवराजला किती संधी मिळाल्या आणि अन्य क्रिकेटपटूंना किती संधी मिळाल्या, हा वादाचा मुद्दा ठरू शकतो.

बीसीसीआयने युवराज सिंगला दिली होती निवृत्तीच्या सामन्याची ऑफर; पण युवी म्हणाला...भारताच्या काही माजी महान खेळाडूंना मैदानात निवृत्ती घेता आली नाही. पण युवराज सिंगला मात्र बीसीसीआयने निवृत्तीचा सामना खेळण्याची ऑफर दिली होती, असे वृत्त काही मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. पण जर असे होते, तर युवराजने मैदानात निवृत्ती घेण्याचे का पसंत केले नाही, याचे उत्तर मिळत नाही.

बीसीसीआय प्रत्येक खेळाडूची चाचणी घेत असते. बीसीसीआयने युवराजची यो-यो टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बीसीसीआयने युवराज सांगितले होते की, " जर तू यो-यो टेस्टमध्ये पास होऊ शकला नाहीस तर तुझ्यासाठी आम्ही निवृत्तीचा सामना ठेवू. " पण युवराजने मात्र या गोष्टीला साफ नकार दिला. कारण कोणाची आपल्यावर मेहेरबानी नको, असा युवराजचा विचार होता.

टॅग्स :युवराज सिंगबीसीसीआय