Join us  

युवराज सिंगच्या 'मेक ओव्हर'ची सानिया मिर्झानं उडवली खिल्ली

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं मेक ओव्हर केले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 12:36 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं मेक ओव्हर केले आहे आणि त्यानं या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारतीय संघाकडून खेळत असताना स्टायलिश खेळाडू म्हणून युवी ओळखला जायचा. त्याच्या ड्रेसिंग स्टाईलचीही बरीच चर्चा रंगायची. पण, आताच्या लूकवर भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झानं त्याची खिल्ली उडवली आहे. 

युवीनं एक फोटो पोस्ट केल्या, त्यावर लिहिले की,''चिकना चमेला! या लूकचे असेच वर्णय करायला हवे. पण, मी पुन्हा दाढी वाढवू का?'' युवीचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला, परंतु सानियानं त्यावरून युवीची फिरकी घेतली. ती म्हणाली,'' पाऊट देऊन गाल लपवण्याचा हा प्रयत्न आहे का? पुन्हा दाढी वाढवं.'' 

धक्कादायक : संघ व्यवस्थापनानं दिलेल्या वागणूकीवर युवराज सिंग बरसला, केला मोठा गौप्यस्फोटयुवराजने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अखेरच्या टप्प्यात संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या वागणुकीमुंळे युवराज प्रचंड निराश झाला होता. दोन दशकं त्यानं टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आणइ 2011च्या वर्ल्ड कप विजयी संघाचा तो खरा नायक होता. युवीनं संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या वागणुकीवर टीका केली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यानं संघ व्यवस्थापनाने त्याच्या निवडीबाबत कसा यू टर्न मारला, हे जगाला सांगितले. 

निवृत्ती घेतल्यानंतर युवीनं संघ व्यवस्थापनाच्या दुटप्पीपणा जगासमोर आणण्याचा निर्धार केला आहे. तो म्हणाला,''  चॅम्पियन्स ट्रॉफीसह खेळलेल्या 8-9 सामन्यांपैकी दोन सामन्यांत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावूनही संघाबाहेर बसावे लागेल याची कल्पना केली नव्हती. मला दुखापत झाली आणि त्यानंतर श्रीलंका मालिकेसाठी तयारी कर, असे सांगण्यात आले. त्यानंतर अचानक Yo-Yo टेस्टच भूत आणलं गेलं. त्यावरून माझ्या निवडीवर यू टर्न मारण्यात आला. वयाच्या 36व्या वर्षी मी Yo-Yo टेस्टच्या तयारीला लागलो आणि त्यात मी पासही झालो. पण, मला तेव्हा स्थानिक क्रिकेट खेळण्यास सांगितले. त्यांना असे वाटत होतं की मी Yo-Yo टेस्ट पास करू शकणार नाही आणि मला ते सहज संघाबाहेर करू शकतील. पण, मी पास झालो.''

टॅग्स :युवराज सिंगसानिया मिर्झा