Join us

श्रीलंकेविरुद्ध युवराजला डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:02 IST

Open in App

नवी दिल्ली : खराब फार्ममध्ये असणाºया युवराज सिंगला श्रीलंकेविरुद्ध होणाºया आगामी एकदिवसीय मालिकेसाठी आज भारतीय संघातून डच्चू देण्यात आला आहे; परंतु निवड समितीने महेंद्रसिंग धोनीवर मात्र विश्वास कायम ठेवला आहे.दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाºया मनीष पांडे याचे संघात पुनरागमन झाले आहे.वेगवान गोलंदाज मोहमद शमी आणि उमेश यादव तसेच फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. युवा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचे संघात पुनरागमन झाले आहे. जसप्रीत बुमराहलादेखील वनडे आणि टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहला वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. पाच वनडे सामन्यांच्या मालिकेस रविवारपासून सुरुवात होणार आहे. याचा समारोप सहा सप्टेंबर रोजी कोलंबोत टष्ट्वेंटी-२० सामन्याने होईल. (वृत्तसंस्था)>भारतीय संघ :विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार व शार्दुल ठाकूर.<एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रकपहिला वनडे : २० आॅगस्ट (डॅम्बुला)दुसरा वनडे : २४ आॅगस्ट (कॅण्डी)तिसरा वनडे : २७ आॅगस्ट (कॅण्डी)चौथा वनडे : ३१ आॅगस्ट (कोलंबो)पाचवा वनडे : ३ सप्टेंबर : (कोलंबो)एकमेव टष्ट्वेंटी-२० सामना६ सप्टेंबर (कोलंबो)