Join us  

"महेंद्रसिंग धोनी मुद्दाम खराब खेळला, विराटला वर्ल्ड कप विजेता कर्णधार बनू द्यायचे नव्हते"

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार MS Dhoniवर निशाणा साधला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 3:59 PM

Open in App

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार MS Dhoniवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात त्यांनी महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. धोनीकडून घडलेल्या प्रकारामुळे माझं रक्त अजूनही खवळत असल्याचे, ते म्हणत आहेत. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धोनीने जाणूनबुजून खराब फलंदाजी केली, ज्यामुळे न्यूझीलंडकडून पराभव झाला. त्याच्याशिवाय अन्य कर्णधाराने भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यावे, अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. 

ते म्हणाले, ''रवींद्र जडेजा एका बाजूने जबरदस्त खेळत होता आणि भारताला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करत होता, तर धोनी त्याच्या क्षमतेनुसार खेळत नव्हता. जर धोनी त्याच्या क्षमतेच्या ४० टक्केही खेळला असता तर आपण ४८व्या षटकातच सामना जिंकू शकलो असतो. लॉजिकवर बोलूया. जडेजा फलंदाजी करत होता तेव्हा तेच गोलंदाज आणि तिच खेळपट्टी होती. तो सतत षटकार आणि चौकार मारत होता. हा भाऊ (धोनी) तू मार, पांड्या को बोले तू मार. त्याने दोन फलंदाज बाद केले.''

तो म्हणाला, 'जेव्हा धोनी CSK कडून खेळतो तेव्हा तो १५ चेंडूत ४० धावा करतो आणि २० चेंडूत ५० धावा करतो. दरम्यान, तो जबरदस्त षटकार आणि चौकारही मारतो. तुम्ही चेन्नई सुपर किंग्जसाठी असं खेळू शकता, पण... न्यूझीलंडविरुद्ध तो जाणुनबुजून खराब खेळला. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही कर्णधाराने भारतासाठी वर्ल्ड कप उंचवावा, अशी त्याची इच्छआ नव्हती.' 

२०१९च्या उपांत्य फेरीचा संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड ८ बाद २३९ धावा ( रॉस टेलर ७३, केन विलियम्सन ६७; भुवनेश्वर कुमार ३/४३, जसप्रीत बुमराह १/३९) वि. वि. भारत ४९.३ षटकांत सर्वबाद २२१ ( रवींद्र जडेजा ७७, महेंद्रसिंग धोनी ५०; मॅट हेन्री ३/३७, मिचेल सँटनर २/३४, ट्रेंट बोल्ट २/४२) 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019महेंद्रसिंग धोनीविराट कोहली
Open in App