Join us  

काल BCCI ने आयपीएलसाठी तंदुरुस्त जाहीर केले अन् आज Rishabh Pant म्हणतो... 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला काल बीसीसीआयने सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 1:31 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला काल बीसीसीआयने सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली. रिषभ पंत ( Rishabh Pant) हा आयपीएल २०२४ खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची घोषणा काल बीसीसाआयने केली. रिषभ पंत आता दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. यावेळी थोडा उत्साही आणि अस्वस्त वाटत असल्याचे रिषभने कबूल केले आणि हे जणू पदार्पण असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातानंतर मैदानापासून दूर रहावं लागलेल्या पंतला १२ मार्च रोजी BCCI ने फिटनेस सर्टीफिकेट दिले. यष्टीरक्षक-फलंदाज आता १४ महिन्यांच्या पुनर्वसन आणि पुनर्प्राप्तीनंतर पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. “मी एकाच वेळी उत्साहित आणि चिंताग्रस्त आहे. मी पुन्हा पदार्पण करणार आहे असे मला वाटत आहे,” असे बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी आवृत्तीसाठी तंदुरुस्त घोषित केल्यावर रिषभ पंत म्हणाला. 

भावनिक रिषभ पुढे म्हणाला की, पुन्हा क्रिकेट खेळणे हे चमत्कारासारखे वाटत आहे. चाहत्यांचे आणि BCCI व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. माझ्या अपघातानंतर  पुन्हा क्रिकेट खेळता येणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. मी माझ्या सर्व हितचिंतक आणि चाहत्यांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बीसीसीआय व एनसीएमधील कर्मचाऱ्यांचा आभारी आहे. त्यांचे सर्व प्रेम आणि पाठिंबा मला प्रचंड शक्ती देत ​​आहे.

पंत असेही म्हणाला की, तो दिल्ली कॅपिटल्स आणि आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे, ही स्पर्धा त्याला खेळायला आवडते. त्याने कॅपिटल्समधील संघ मालक आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले. “मी दिल्ली कॅपिटल्स आणि आयपीएलमध्ये परतण्यास उत्सुक आहे. आमचे संघ मालक आणि सहाय्यक कर्मचारी प्रत्येक टप्प्यावर त्यांचे पूर्ण समर्थन, मार्गदर्शन आणि सहकार्याने माझ्या पाठीशी आहेत, ज्यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. मी माझ्या DC कुटुंबासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि चाहत्यांसमोर पुन्हा खेळण्याची आणखी वाट पाहू शकत नाही.”

DC २३ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध IPL 2024 तील पहिला सामना मोहाली येथे खेळतील. 

टॅग्स :आयपीएल २०२४रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सबीसीसीआय