Join us  

डब्ल्यूटीसी फायनल : तयारी अर्धवट, पण अनुभवाच्या बळावर न्यूझीलंडला हरवू! टीम इंडियाचे कोच अरुण, श्रीधर यांचा विश्वास

भारतीय खेळाडूंना एक आठवडा मुंबईत क्वारंटईन झाल्यानंतर दोन जून रोजी इंग्लंडकडे रवाना व्हावे लागेल. तेथे पुन्हा दहा दिवस क्वारंटाईन व्हायचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 7:33 AM

Open in App

नवी दिल्ली : कोरोना क्वारंटाईमुळे भारताला इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. तथापि गोलंदाजी कोच भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर यांनी आमच्या खेळाडूंच्या अनुभवी क्षमतेच्या बळावर यशस्वी होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.भारतीय खेळाडूंना एक आठवडा मुंबईत क्वारंटईन झाल्यानंतर दोन जून रोजी इंग्लंडकडे रवाना व्हावे लागेल. तेथे पुन्हा दहा दिवस क्वारंटाईन व्हायचे आहे. १८ जूनपासून साउदम्पटन येथे होणाऱ्या अंतिम सामन्याआधी विराट आणि त्याच्या संघाला सरावाची परवानगी मिळेल का, हे अद्याप निश्चित नाही.यानंतर ऑगस्टपासून भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. फायनलच्या तयारीसाठी किती वेळ मिळेल, असा प्रश्न श्रीधर यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, ‘आमच्याकडे काही पर्याय असेल असे मला वाटत नाही. आम्हाला जितका वेळ मिळेल त्याला लाभ घेऊ. या सर्व गोष्टी आमचे क्वारंटाइन होणे आणि सरावासाठी मिळणारा कालावधी यावर विसंबून असतील. कोरोनाचे आव्हान, खेळाडूंसाठी असलेले बायोबबल आणि क्वारंटाईन या गोष्टींमुळे खेळाडूंचे वेळापत्रक तयार करणे कठीण होत आहे. तथापि अपुऱ्या तयारीसह उतरण्याच्या मानसिकतेमुळे खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरीदेखील करू शकतात.’गोलंदाजी कोच अरुण यांनी खेळाडूंना घरच्या घरी काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत. अरुण म्हणाले, ‘मी खेळाडूंना काही भूमिका वाटून दिल्या. सर्वजण एकत्र येतील तेव्हा सर्वोत्कृष्ट योजना आखण्यात येतील. इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्याचा लाभ न्यूझीलंडला अंतिम सामन्यादरम्यान होईल, यात शंका नाही. मात्र, आमचे खेळाडूदेखील अनुभवाचा लाभ घेऊ शकतील.’

मानसिकरीत्या स्मार्ट होण्याची हीच वेळ!ही मानसिकदृष्ट्या स्मार्ट होण्याची वेळ आहे. आमच्याकडे फायनल खेळणारा अनुभवी संघ आहे. आमचे खेळाडू प्रत्येक परिस्थितीत ताळमेळ साधू शकतात. सर्वच खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध खेळले. इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहेच. त्यामुळे हे आव्हान स्वीकारण्यासाठी अनुभव मोलाचा ठरेल. किती सराव हवा हे आम्ही ठरवू शकणार नाही. आम्हाला जितकी संधी मिळेल, तितकाच सराव करावा लागणार आहे. अनेकदा कमी तयारीस उतरले की अधिक सावधपणे खेळतो आणि त्यात मोठे यशदेखील मिळते. आम्ही याच मानसिकतेसह खेळणार आहोत,’ असे श्रीधर यांनी सांगितले.............द्रविडने सज्ज केला खेळाडूंचा समूह, प्रतिभावान युवा खेळाडू ओळखण्यात भारत आघाडीवर - चॅपलसिडनी :  भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियन मानसिकतेचा अभ्यास करून देशांतर्गत संरचना तयार केली जी की देशातील राष्ट्रीय संघाला सातत्याने खेळाडू देत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला याचीच उणीव भासत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केले. युवा खेळाडूंना ओळखण्यात भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे, असेही चॅपल म्हणाले.चॅपेल यांनी ‘क्रिकेट.कॉम.एयू’शी बोलताना म्हटले, ‘‘आम्ही काय करीत आहोत हे राहुल द्रविड आमच्याकडून शिकला आणि भारतात याची पुनरावृत्ती केली. भारताजवळ  जास्त पर्याय होते. त्यामुळे भारताने यश प्राप्त केले.’’ या वर्षाच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाचे खेळाडू जखमी झाल्यामुळे भारताच्या दुय्यम संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर  धूळ चारत बॉर्डर गावसकर करंडक जिंकला होता. कर्णधार विराट कोहलीदेखील वैयक्तिक कारणामुळे चार सामन्यांच्या मालिकेतील फक्त एकच सामना खेळू शकला होता. चॅपल यांच्यानुसार भारताजवळ प्रभावी खेळाडूंची विकास प्रणाली आहे आणि त्यांच्या युवा खेळाडूंजवळदेखील आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. भारताचे माजी प्रशिक्षक चॅपल म्हणाले, ‘‘जर तुम्ही ब्रिस्बेन कसोटी खेळणारा भारतीय संघ पाहिला तर यात तीन ते चार नवीन खेळाडू होते. हे खेळाडू भारत अ संघासाठी खूप सामने खेळलेले होते आणि ते ही फक्त भारतातच नव्हे तर विविध परिस्थितीत खेळले होते. त्यामुळे जेव्हा ते निवडले गेले ते नवखे खेळाडू नव्हते, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होते.’’

‘पूर्वी आम्ही खेळाडूंना तयार करण्यात सर्वोत्तमपैकी एक होतो आणि त्यांना व्यवस्थेशी जोडून ठेवत होतो; परंतु गेल्या काही वर्षांत यात बदल झाला, असे मला वाटते. मी गुणवत्ता असणारा  युवा खेळाडूंचा समूह पाहिला आहे. मात्र, त्यांना पुरेशी संधी मिळत नाही.  आम्ही गुणवत्ता शोधण्यात आपले सर्वोत्तम स्थान गमावले, असे मला वाटते. भारत आमच्यापेक्षा जास्त चांगले कार्य करीत आहे.’’ 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडक्रिकेट सट्टेबाजी