Join us  

गुजरातमधील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठव!; हार्दिक पांड्याला भारतीय खेळाडूची विनंती

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) १४ गुणांसह आघाडीवर आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात MIला पराभव पत्करावा लागला होता.

By स्वदेश घाणेकर | Published: October 27, 2020 11:35 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) १४ गुणांसह आघाडीवर आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात MIला पराभव पत्करावा लागला होता. पण, त्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) फटकेबाजीनं सर्वांची मनं जिंकली होती. हार्दिकनं २१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ६० धावा कुटल्या होत्या. विशेष म्हणजे त्याला पहिल्या ९ चेंडूंत ८ धावा करता आल्या, परंतु त्यानंतर त्यानं जोरदार दाणपट्टा फिरवताना ही वादळी खेळी केली. या फटकेबाजीनंतर हार्दिकनं गुडघ्यावर बसून एक हात वर करत #BlackLivesMatter चळवळीला पाठिंबा दिला. त्याच्या या कृतीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. 

आता भारताची धावपटू ओ पी जैशानं भारतीय क्रिकटपटूला गुजरातमध्ये दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठव अशी विनंती केली. आशियाई स्पर्धेत ५००० मीटर ( २००६ दोहा) आणि १५०० मीटर ( २०१४ इंचाँन) स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या जैशानं ट्विट केलं की,'' #BlackLivesMatterया चळवळीला पाठिंबा दिलास, त्याचे कौतुकच करते. लोकांसाठी क्रीडापटूंनी आवाज उठवणं महत्त्वाचं आहे. माझी एक विनंती आहे, असाच आवाज तू तुझे राज्य म्हणजेच गुजरात येथील दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आणि देशभरात मुस्लीमांना केले जाणाऱ्या टार्गेटविरोधात उठव. धन्यवाद.''   

टॅग्स :हार्दिक पांड्याIPL 2020