विश्वचषक जिंकून देणारा मोर्गन क्रिकेटमधून निवृत्त

२००६ला त्याने स्कॉटलंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 05:33 AM2023-02-14T05:33:37+5:302023-02-14T05:34:13+5:30

whatsapp join usJoin us
World Cup winner Morgan retires from cricket | विश्वचषक जिंकून देणारा मोर्गन क्रिकेटमधून निवृत्त

विश्वचषक जिंकून देणारा मोर्गन क्रिकेटमधून निवृत्त

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू तसेच २०१९ ला वन डे विश्वचषक जिंकूण देणाऱ्या इयोन मोर्गन याने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपण निवृत्त झाल्याचे जाहीर करताना त्याने खेळापासून दूर होण्याची हीच खरी वेळ आहे, असे सांगितले आहे. इयोन मोर्गनची क्रिकेट कारकीर्द १६ वर्षे राहिली. 

२००६ला त्याने स्कॉटलंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले होते.   मोर्गनने एकदिवसीय क्रिकेटसाठी इंग्लंडच्या टीमचे यशस्वी नेतृत्व केले. त्याने १२६ एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. यापैकी ७६ सामन्यांत इंग्लंडचा विजय झाला होता. 
कारकीर्दीत एकूण २५८ एकदिवसीय सामने खेळलेल्या मोर्गनच्या नावावर १४ शतकांची नोंद आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ७,७०१ धावा केल्या.  त्याने  १६ कसोटी सामनेदेखील खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन शतके असून, त्याने  ७०० धावा केल्या आहेत.

इयोन मोर्गन नेतृत्वाचा रेकॉर्ड
 वन डे: १९८ सामने, ११८ विजय
 टी-२०:  १२९ सामने, ६० विजय

Web Title: World Cup winner Morgan retires from cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.