Join us  

'ती' विनंती अमान्य; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला दणका, IPL 2020वर संकट!

पीसीबीने कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक स्पर्धा खेळवण्याचा निर्धार बोलून दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 2:20 PM

Open in App
ठळक मुद्देIPL 2020च्या मार्गात आशिया चषक व पीएसएलचा अडथळासप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आयोजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर ( बीसीसीआय) दबाव वाढत आहे. ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयने दंड थोपटले आहेत. पण, आयपीएलचे सुधारीत वेळापत्रक तयार करण्याबरोबरच त्यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत.  बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे ( पीसीबी) विनंती केली होती, परंतु पीसीबीनं ती अमान्य केली आहे. त्यामुळे BCCIची डोकेदुखी वाढली तर आहेच, शिवाय आयपीएलवर संकट आले आहे.

वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचे टी 10लीगमध्ये धडाकेबाज शतक, युवराज सिंगचा विक्रम थोडक्यात वाचला

पीसीबीने कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक स्पर्धा खेळवण्याचा निर्धार बोलून दाखवला. त्यात त्यांनी पाकिस्तान सुपर लीग ( पीएसएल) खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी आशिया चषक होणारच असे बुधवारी जाहीर केले. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिराती येथे आशिया चषक खेळवण्याचा पीसीबीचा प्रयत्न आहे. शिवाय पीएसएलच्या उर्वरित सामने नोव्हेंबरमध्ये खेळवण्याचा त्यांचा विचार आहे. 

बीसीसीआयही आयपीएल सप्टेंबर-नोव्हेंबर मध्ये खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण, आशिया चषक झाल्यास बीसीसीआयसमोर मोठं संकट उभं राहू शकतं. त्यामुळे बीसीसीआयने पीसीबीला यंदा पीएसएल न खेळवण्याची आणि त्या तारखांमध्ये आशिया चषक खेळवण्याची विनंती केली आहे. "आशिया चषक यंदा होणे अवघड आहे. पण, पीसीबीने जाहीर केलेली तारीख त्यांच्यासाठी सोईची आहे, आमच्यासाठी नाही. त्यांनी पीएसएल पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्यास काही तोडगा निघू शकतो. अन्यथा आशिया चषक होणे शक्य नाही," असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

पीसीबीनं ही विनंती फेटाळून लावली. सूत्रांच्या माहितीनुसार पीएसएल स्थगित करण्यास पीसीबीची तयारी नाही. कोरोना व्हायरसमुळे पीएसएलच्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना स्थगित करण्यात आला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video  

मोहम्मद हाफिजच्या बंडानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं डोकं टाळ्यावर; घेतला मोठा निर्णय

वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घडलं होतं असं काहीतरी...; विजय शंकरचा मोठा खुलासा

आता मोदी सरकार कच्चं तेल इराककडून खरेदी करणार नाही, तर...; जितेंद्र आव्हाडांचा टोला

  

टॅग्स :आयपीएल 2020बीसीसीआयपाकिस्तान