मुंबई : गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित माऱ्यानंतर फलंदाजांच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंड संघाने तिरंगी महिला टी२० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देताना बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ८ बळींनी नमवले. ऑस्ट्रेलियाला निर्धारीत २० षटकात ८ बाद १४९ असे रोखल्यानंतर इंग्लंडने १७ षटकातच बाजी मारताना केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात १५० धावा केल्या. गोलंदाजीत २ बळी घेतल्यानंतर आक्रमक अर्धशतक झळकावून निर्णायक अष्टपैलू खेळी केलेल्या नताली स्किवरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची पाचव्या षटकात २ बाद ३४ अशी अडखळती सुरुवात झाली होती. मात्र, तम्सिन ब्युमोंट आणि नताली स्किवर यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत इंग्लंडला दमदार विजय मिळवून दिला. यासह भारत दौºयावरील आॅस्टेÑलियाचा विजयी रथही रोखला गेला. तम्सिनने ४४ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ५८ धावा काढल्या. दुसरीकडे स्किवरने जबरदस्त हल्ला करताना ४३ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८ धावांचा तडाखा दिला. या दोघींनी तिसºया बळीसाठी ११६ धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाºया आॅसी संघाला अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. ठराविक अंतराने बळी गेल्याने त्यांचा अर्धा संघ ९७ धावांत परतला होता. कर्णधार राचेल हेनेस हिने ४५ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ६५ धावांची खेळी केल्याने आॅस्टेÑलियाला समाधानकारक मजल मारता आली. याशिवाय अलिसा हेली (३१) आणि अश्ले गार्डनर (२८) यांनी चांगली झुंज दिली. याशिवाय आॅस्टेÑलियाच्या कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. जेनिफर गनने २६ धावांत ३, तर स्किवरने २९ धावांत २ बळी घेत आॅस्टेÑलियाला रोखण्यात मोलाचे योगदान दिले.