Join us  

महिला टी२०; भारतीयांना फलंदाजी सुधारण्याचे आव्हान

इंग्लंडविरुद्ध सातत्य राखण्याचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 3:33 AM

Open in App

मेलबर्न : भारतीय महिला क्रिकेट संघाला टी२० तिरंगी मालिकेतील इंग्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्यात फलंदाजीत सुधारणा घडवून आणण्याची गरज असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागच्या सामन्यात मधली फळी अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघ चार बळींनी पराभूत झाला. त्याआधी पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर पाच बळींनी मात केली होती. स्मृती मानधना (३५) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२८) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकले नव्हते. अखेरचे ६ बळी २१ धावात बाद झाल्याने भारतीय संघ कोलमडला होता.

महिला क्रिकेटचे भविष्य मानली जाणारी शेफाली वर्मा तीन चेंडू खेळून बाद झाली, तर जेमिमा रॉड्रिग्जने ११ चेंडूत केवळ एक धाव केली होती. गोलंदाजांनी हा सामना १९ व्या षटकांपर्यंत खेचला खरा, मात्र विजय मिळविण्यासाठी त्यांच्याकडे धावा शिल्लक नव्हत्या. ऑस्ट्रेलियात २१ फेब्रुवारीपासून सुरू होत अलेल्या टी२० विश्वचषकासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जात असलेल्या या स्पर्धेत तिन्ही संघांचे प्रत्येकी दोन-दोन गुण आहेत. 

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमुर्ती, तानिया भाटिया, दीप्ती शर्मा, शिखा पांड्ये, पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रिचा घोष, अरुंधती रेड्डी, हरलीन देओल, नुझत परवीन आणि पूनम यादव.

इंग्लंड : हीथर नाइट (कर्णधार), अ‍ॅमी एलेन जोन्स, डॅनियम वॅट, नताली स्किव्हर, फ्रॅन विल्सन, कॅथरिन ब्रंट, टॅमी ब्यूमोंट, लॉरेन विनफिल्ड, फ्रेया डेव्हिस, सोफी एक्लेस्टोन, साराह ग्लेन, अन्या श्रुबसोल, जॉर्जिया एल्विस, केट क्रॉस आणि मॅडी विलर्स.

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटभारत