Join us  

Womens T20 Challenge Final SNO vs VEL : RCB पेक्षा जास्त धावा सुपरनोव्हाजने केल्या; डिएंड्रा डॉटिन, हरमनप्रीत कौरने षटकारांचा पाऊस पाडला

Womens T20 Challenge Final SUPERNOVAS vs VELOCITY : सुपरनोव्हाज व व्हेलॉसिटी यांच्यातल्या महिला ट्वेंटी-२० लीग चॅलेंज अंतिम सामन्यात षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 9:12 PM

Open in App

Womens T20 Challenge Final SUPERNOVAS vs VELOCITY : सुपरनोव्हाज व व्हेलॉसिटी यांच्यातल्या महिला ट्वेंटी-२० लीग चॅलेंज अंतिम सामन्यात षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. व्हेलॉसिटीच्या गोलंदाज व क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुकांचा पुरेपूर फायदा सुपरनोव्हाने उचलला. प्रिया पुनिया ( Priya Punia ) , डिएंड्रा डॉटिन ( Deandra Dottin ) आणि हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) यांनी चांगली फटकेबाजी करताना अंतिम सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडला. IPL 2022त  क्वालिफायर २ मध्ये RCBला १५७ धावाच करता आल्या होत्या, त्यापेक्षा अधिक धावा महिला ट्वेंटी-२० लीग चॅलेंजच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाज संघाने केल्या. 

नाणेफेक जिंकून व्हेलॉसिटीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रिया पुनिया व डॉटिन यांनी पहिल्या विकेटसाठी ९.३  षटकांत ७३ धावांची भागीदारी केली. सिमरन बहादूरने व्हेलॉसिटीला पहिली विकेट मिळवून दिली, पुनिया २९ चेंडूंत २ षटकारांसह २८ धावा केल्या. व्हेलॉसिटीच्या खेळाडूंनी अनेक झेल सोडले आणि त्याचा फायदा सुपरनोव्हाजने उचलला. डॉटीनने त्यानंतर कर्णधार हरमनप्रीतसह ३६ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. १५व्या षटकात व्हेलॉसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने ही भागीदारी तोडली. डॉटिन ४४ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ६२ धावांवर त्रिफळाचीत झाली. 

१७व्या षटकात पूजा वस्त्राकर ( ५) आयाबोंगा खाकाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. १८व्या षटकात केट क्रॉसने सुपरनोव्हाजला मोठा धक्का दिला. २९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४३ धावा करुन हरमनप्रीत बाद झाली. त्याच षटकात सोफी एकलस्टन ( २) माघारी परतली. १९व्या षटकात दीप्ती शर्माने सुपरनोव्हाजला आणखी एक धक्का देताना सुन ल्यूसची ( ३) विकेट घेतली. सुपरनोव्हाजने ७ बाद १६५ धावा कुटल्या. केट क्रॉस, दीप्ती शर्मा व सिमरन बहादूर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटआयपीएल २०२२
Open in App