WPL Auction 2023: लग्न समारंभामुळे BCCI ची कोंडी; WPL च्या ऑक्शनसाठी हॉटेल मिळेना, समोर आली नवी तारीख

wpl auction 2023 players list: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 05:33 PM2023-02-01T17:33:41+5:302023-02-01T17:34:56+5:30

whatsapp join usJoin us
Women's Premier League auction is likely to be held on February 13 as the BCCI is unable to get a hotel due to wedding season  | WPL Auction 2023: लग्न समारंभामुळे BCCI ची कोंडी; WPL च्या ऑक्शनसाठी हॉटेल मिळेना, समोर आली नवी तारीख

WPL Auction 2023: लग्न समारंभामुळे BCCI ची कोंडी; WPL च्या ऑक्शनसाठी हॉटेल मिळेना, समोर आली नवी तारीख

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

wpl auction date 2023 । नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) देशात होत असलेल्या सततच्या विवाहांमुळे कोंडी झाली आहे. कारण महिला प्रीमियर लीगचे संघ फायनल झाल्यानंतर आता खेळाडूंचा लिलाव होणार आहे. बीसीसीआय या लिलावाचे आयोजन करणार असून त्यासाठी जागा, हॉटेल आणि सर्व व्यवस्था बोर्डाला करावी लागणार आहे. पण आता हॉटेलबाबत बीसीसीआयसमोर समस्या निर्माण झाली आहे. खरं तर लग्नाच्या या हंगामात (BCCI WPL Auction) BCCI ला लिलावासाठी हॉटेल बुकिंग मिळत नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, 6 फेब्रुवारी रोजी मुंबईत खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्याचे बीसीसीआयचे नियोजन होते. त्यामुळे मार्चमध्ये सुरू होणाऱ्या WPL हंगामासाठी एका महिन्याच्या आत पाच नवीन फ्रँचायझी तयार होतील. मात्र, बीसीसीआयला दोन कारणांमुळे ती योजना बदलणे भाग पडले. पहिले म्हणजे पाच WIPL फ्रँचायझींच्या बहुतांश मालकांकडे UAE मधील ILT20 आणि दक्षिण आफ्रिकेतील SA20 मधील संघ देखील आहेत, या स्पर्धांचे अंतिम सामने अनुक्रमे 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. 

कधी होणार लिलाव? 
बीसीसीआयने अद्याप नवीन फ्रँचायझींना लिलावाची तारीख सांगितलेली नाही. पण बोर्ड फ्रँचायझींच्या विनंतीकडे लक्ष देईल आणि ते लक्षात घेऊन तारीख ठरवेल असे मानले जाते. लक्षणीय बाब म्हणजे 13 फेब्रुवारीला लिलाव होण्याची दाट शक्यता आहे. लिलावाचे ठिकाण देखील अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु ते मुंबई आणि दिल्ली यातील असू शकते. 

लग्न समारंभामुळे BCCI ची कोंडी
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआय सध्या लिलावासाठी योग्य हॉटेलच्या शोधात आहे. आता सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने हॉटेल शोधणे ही त्यांच्यासाठी मोठी समस्या बनली आहे. बीसीसीआयचे व्यवस्थापक या कामात व्यस्त आहेत. लिलाव कुठे होणार याबाबत येत्या एक-दोन दिवसांत निर्णय होऊ शकतो.
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

Web Title: Women's Premier League auction is likely to be held on February 13 as the BCCI is unable to get a hotel due to wedding season 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.