Join us  

शामीचे प्रत्येक देशांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा पत्नी हसीनचा दावा

शामी ज्या देशांमध्ये जायचा त्या प्रत्येक देशामध्ये त्याचे अनैतिक संबंध होते. यामध्ये काही विशीतल्या तरुणी, बिझनेस वुमन्स, तर काही वेश्यांचाही यामध्ये समावेश असल्याचा गंभीर आरोप शामीची पत्नी हसीन जहाँने केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 1:17 PM

Open in App
ठळक मुद्देपाकिस्तानच्या आलिशबा या तरुणीशी दुबईमध्ये एकाच रुममध्ये राहण्याचा आरोप

कोलकाता : सलग दुसऱ्या दिवशीही भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शामी ज्या देशांमध्ये जायचा त्या प्रत्येक देशामध्ये त्याचे अनैतिक संबंध होते. यामध्ये काही विशीतल्या तरुणी, बिझनेस वुमन्स, तर काही वेश्यांचाही यामध्ये समावेश असल्याचा गंभीर आरोप शामीची पत्नी हसीन जहाँने केला आहे. याबरोबरच तिने शामीचे एक प्रकरणही यावेळी उघड केले आहे. शामीचे इंग्लंड, दुबई, नायजेरियासह पाकिस्तानमध्ये त्याचे अनैतिक संबंध असल्याचे हसीनने यावेळी उघड केले आहे.

शामीचे हे प्रताप बऱ्याच वर्षांपासून सुरु आहेत. शामीच्या बीएमडब्ल्यू गाडीमध्ये त्याचा एक मोबाईल मिळाला आणि त्यामधून त्याचा हा काळा चेहरा समोर आल्याचे हसीनने म्हटले आहे. हा मोबाईल इंग्लंडमधील मोहम्मद या व्यक्तीचा असल्याचे शामी सांगत असला तरी ते सत्य नाही. कारण मोहम्मद यांच्या घरी मी स्वत: जाऊन आले असून ते सुसंस्कृत आहेत. त्यामुळे हे सारे प्रकार लपवण्यासाठी शामी खोटे होलत आहे, असे हसीनने सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जेव्हा शामी गेला होता तेव्हा तो एका पाकिस्तानच्या मुलीच्या सातत्याने संपर्कात होता आणि त्याच्यामध्ये अनैतिक संबंधही होते, असा आरोप हसीनने केला आहे.

शामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला असता तो पाकिस्तानमधील अलिशबा या मुलीच्या सातत्याने संपर्कात होता. अलिशबा दक्षिण आफ्रिकेमध्येच या भारताच्या दौऱ्यादरम्यान वास्तव्य करत होती. हा दौरा झाल्यावर शामीने तिचे दुबईचे विमानाचे तिकीट काढले होते. दुबईमध्ये शामीने अलिशबासह एकच रुम बुक केला होता. काही दिवस तो तिच्यासोबत एकत्र, एकाच रुममध्ये राहिला होता, असे हसीनने सांगितले आहे.

शामी आणि अलिशबा  यांच्यातील संवादाचे पुरावे हसीनने यावेळी प्रसारमाध्यांसमोर आणले आहेत. हे पुरावे घेऊन हसिन तिच्या वकिलांना भेटायला गेली आहे. या प्रकरणी शामीला न्यायालयात खेचणार असल्याचे सुतोवाचही हसीनने यावेळी केले आहे.

टॅग्स :मोहम्मद शामीक्रिकेट