Join us

भारत अ अंडर १९ चा दणदणीत विजय

आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळींच्या बळावर भारत अ अंडर १९ संघाने चौरंगी अंडर १९ मालिकेत मंगळवारी येथे दक्षिण आफ्रिका अंडर १९ संघावर १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 04:26 IST

Open in App

तिरुवनंतपुरम : आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळींच्या बळावर भारत अ अंडर १९ संघाने चौरंगी अंडर १९ मालिकेत मंगळवारी येथे दक्षिण आफ्रिका अंडर १९ संघावर १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शाश्वत रावत (६४) आणि कामरान इकबाल (६0) यांचे अर्धशतक आणि ध्रुव जुरेल (३८) याच्या उपयुक्त खेळीच्या बळावर ५0 षटकांत २५0 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सन याने ३0 धावांत ४ गडी बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीने भारताने अखेरचे ६ फलंदाज ४७ धावांत गमावले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ३५.४ षटकांत ९४ धावांत ढेपाळला. त्यांचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. (वृत्तसंस्था)