Join us  

रवी शास्त्री यांचे प्रशिक्षकपद जाणार? बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

रवी शास्त्री यांचे प्रशिक्षक पद जाणार का, याबाबत राय यांनी मोठा खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:26 PM

Open in App

मुंबई : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद कायम राहणार की नाही, हा सध्याच्या घडीला मोठा प्रश्न भारतीय संघासमोर आहे. कारण ज्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवडणूक केली होती त्यांना आता बीसीसीआयने नोटीस पाठवली आहे. जर या नोटीशीला सल्लागार समितीने योग्य उत्तर दिले नाही तर ही समिती बरखास्त करण्यात येईल आणि त्यांनी शास्त्री यांच्या निवडीचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात येईल. पण याबाबत बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी विनोद राय यांनी एक वक्तव्य केले आहे. रवी शास्त्री यांचे प्रशिक्षक पद जाणार का, याबाबत राय यांनी मोठा खुलासा केला आहे.

 येत्या काही दिवसांमध्ये टीम इंडिया मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद रद्द होऊ शकते, असे म्हटले जात आहे. कारण बीसीसीआयने शास्त्री यांची ज्यांनी निवड केली त्या क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांना परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. जर या नोटीशीला या सदस्यांना योग्य ते उत्तर देता आले नाही, तर शास्त्री यांची निवड रद्द होऊ शकते.

 क्रिकेट सल्लागार समितीमधील कपिल देव, अंशुमन गायकवाड, शांता रंगास्वामी यांना बीसीसीआयने परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर त्यांना या नोटीशीला उत्तर पाठवण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. बीसीसीआयकडून नोटीस मिळाल्यावर रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. त्यामुळे जर  क्रिकेट सल्लागार समितीमधील सदस्यांना योग्य ते उत्तर बीसीसीआयच्या नोटीशीला देता आले नाही तर शास्त्री यांचे प्रशिक्षकपद रद्द होऊ शकते.

 परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी क्रिकेट सल्लागार समितीतील सदस्या शांत रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

यावेळी रंगास्वामी यांनी सांगितले की, " माझ्याकडे बरेच काम आहे. त्यामुळे मी क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. परस्पर हितसंबंध जपल्याचे आमच्याबाबत म्हटले जाते. पण जर असे होत राहीले तर एकही क्रिकेटपटू सल्लागार समितीमध्ये काम करू शकत नाही. क्रिकेट सल्लागार समितीची बैठक वर्षातून 2-3 वेळा होता. त्यामुळे परस्पर हितसंबंध जपल्याचा मुद्दाच येत नाही."

याबाबत विनोद राय म्हणाले की, " सल्लागार समितीची स्थापना करण्यापूर्वी आम्ही या तिन्ही सदस्यांकडून आपले परस्पर हितसंबंध जपले जाणार नाहीत ना, याबाबत घोषणापत्र मागवले होते. त्यावेळी बीसीसीआयने या सदस्यांचे परस्पर हितसंबंध जपले जाणार नाहीत, याची खात्री बीसीसीआयने केली होती. त्याचबरोबर सल्लागार समितीही फक्त काही कालावधीपुरतीच मर्यादीत होती. त्याचबरोबर रवी शास्त्री यांच्याबरोबर बीसीसीआयने करार केला आहे. त्यामुळे शास्त्री यांची निवड योग्य आहे. त्यामध्ये कुठलीही समस्या जाणवत नाही."

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआय