अबुधाबी : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ आज,शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध भिडेल. राजस्थानला प्ले ऑफ गाठण्याच्या दृष्टीने विजय अनिवार्य असला, तरी सध्या दिल्लीकरांचा सुरू असलेला धडाका पाहता, त्यांचा विजयी रथ रोखणे राजस्थानला सोपे जाणार नाही. राजस्थानने आपल्या अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्जचा अखेरच्या चेंडूवर थरारक पराभव केला होता.पहिल्या सत्रात ८ पैकी ६ सामने जिंकलेल्या दिल्लीने दुसऱ्या सत्रात दमदार सुरुवात करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला होता. दुसरीकडे, पहिल्या सत्रात सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव राहिलेल्या राजस्थानने दुसऱ्या सत्रात विजयी कामगिरी करताना पंजाबविरुद्ध हातातून गेलेला सामना जिंकण्याची कामगिरी केली. त्यामुळेच दिल्लीकर फॉर्ममध्ये असले, तरी अखेरपर्यंत हार न मानणाऱ्या झुंजार राजस्थान संघाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी त्यांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दिल्लीचा धडाका राजस्थान रोखणार? राजस्थानला प्ले ऑफ गाठण्याच्या दृष्टीने विजय अनिवार्य
दिल्लीचा धडाका राजस्थान रोखणार? राजस्थानला प्ले ऑफ गाठण्याच्या दृष्टीने विजय अनिवार्य
अबुधाबी : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला दिल्ली कॅपिटल्स संघ आज,शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध भिडेल. राजस्थानला प्ले ऑफ गाठण्याच्या दृष्टीने विजय अनिवार्य ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 10:47 IST