कराची : पुढील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भारतात आयोजित हॉकी विश्वचषकासाठी भारत सरकारने आमच्या खेळाडूंना उच्चस्तर सुरक्षेची हमी द्यावी शिवाय सहजपणे व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा स्पर्धेवर बहिष्कार टाकू, अशी धमकी पाकिस्तान हॉकी महासंघाने दिली.
पाकिस्तान हॉकीचे अध्यक्ष खालिद खोकर यांनी पाकिस्तान संघाची सुरक्षा तसेच वेळेत व्हिसा मिळण्यासाठी गेले कित्येक महिने प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. यासाठी पाकिस्तान बोर्डाच्या अधिकाºयांनी आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांची भेट घेतली होती. ‘पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष आणि नरेंद्र बत्रा यांच्यात नुकतीच दुबई येथे बैठक झाली. आमच्या सर्व समस्या आम्ही नरेंद्र बत्रा यांच्यापुढे मांडल्या.’