T20 WC 24 WI vs ENG : विंडिजची गाडी 'सुस्साट' मग लागला ब्रेक; तरीही यजमानांनी उभारली मोठी धावसंख्या

WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 : वेस्ट इंडिजने इंग्लंडला तगडे लक्ष्य दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 07:39 AM2024-06-20T07:39:58+5:302024-06-20T07:46:33+5:30

whatsapp join usJoin us
WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 West Indies set England a target of 181 runs to win | T20 WC 24 WI vs ENG : विंडिजची गाडी 'सुस्साट' मग लागला ब्रेक; तरीही यजमानांनी उभारली मोठी धावसंख्या

T20 WC 24 WI vs ENG : विंडिजची गाडी 'सुस्साट' मग लागला ब्रेक; तरीही यजमानांनी उभारली मोठी धावसंख्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WI vs ENG T20 World Cup 2024 : सुपर-८ च्या दुसऱ्या लढतीत यजमान वेस्ट इंडिज आणि गतविजेता इंग्लंडचा संघ भिडला. विडिंजने विजयाचा चौकार लगावत इथपर्यंत मजल मारली. तर इंग्लिश संघाला अपघातामुळे सुपर-८ चे तिकीट मिळाले असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. स्कॉटलंडच्या तोंडचा घास पळवून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्याने इंग्लंडला आयती संधी मिळाली. पण, आज होत असलेल्या सुपर-८ च्या लढतीत इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात वेस्ट इंडिजच्या संघाला यश आले. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. 

सुरुवातीला स्फोटक खेळी केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या सुस्साट गाडीला ब्रेक लावण्यात इंग्लंडला यश आले. अखेर यजमान संघ निर्धारित २० षटकांत ४ बाद १८० धावा करू शकला. त्यामुळे इंग्लंडला सुपर-८ मध्ये विजयी सलामी देण्यासाठी १८१ धावांची गरज आहे. 

वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी स्फोटक खेळी केली. पण, दुखापतीमुळे किंगला रिटायर्ड हर्ट तंबूत परतावे लागले. त्यानंतर इंग्लिश गोलंदाजांना पुनरागमन करता आले. यजमानांनी ९४ धावांवर आपला पहिला गडी गमावला. मग सांघिक खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने तगडी धावसंख्या उभारली. यजमानांकडून ब्रँडन किंग (२३), जॉन्सन चार्ल्स (३८), निकोलस पूरन (३६), रोवमन पॉवेल (३६) आणि शेरफेन रूदरफोर्डने नाबाद २८ धावा केल्या. तर इंग्लिश संघाकडून गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मोईन अली आणि लियाम लिव्हिंस्टोन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. 

वेस्ट इंडिजचा संघ - 
रोवमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, रोस्टन चेस, शेरफेन रूदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमारियो शेफर्ड, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती.

इंग्लंडचा संघ -
जोस बटलर (कर्णधार), फिलिप साल्ट, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड, रीस टॉपले.

Web Title: WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 West Indies set England a target of 181 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.