Join us  

IPL 2022, KL Rahul : विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांच्यावर आयपीएलने बंदी घातली पाहिजे; लोकेश राहुलने का केलेली अशी मागणी 

IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गतउपविजेता कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 9:34 AM

Open in App

IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गतउपविजेता कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. आयपीएल २०२२मध्ये लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रँचायझी दाखल झाल्याने सर्वच संघात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. लोकेश राहुल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे २०१३ आणि २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सदस्य होते. अनकॅप्ड खेळाडू असताना RCB ने लोकेशला करारबद्ध केले होते आणि त्यानंतर २०१६मध्ये तो पुन्हा RCB मध्ये कॅप्ड खेळाडू म्हणून परतला. 

२०१७मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे लोकेशने आयपीएलमधून माघार घेतली आणि त्यानंतर पुढील चार वर्ष त्याने पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व केला आणि आता तो लखनौ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. RCB कडून खेळताना लोकेशला काही विशेष यश मिळाले नाही. कोहली अजूनही RCB कडून खेळतोय आणि तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. RCB कडून खेळताना एबी डिव्हिलियर्सने भारतात सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली.

आयपीएल २०२०च्या सुरूवातीला लोकेशने मस्करीत कोहली व एबी डिव्हिलियर्स यांच्यावर आयपीएल बंदी घालायला हवी अशी मागणी केली होती. RCBचा माजी कर्णधार कोहली याच्यासोबत बोलताना लोकेश म्हणाला होता की,''ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मला असं वाटतं की आयपीएलने कोहली व एबी यांच्यावर पुढील वर्षी बंदी घालायला हवी. तुम्ही धावांचा रतीब घातल्यानंतर लोकांनीही आता बस झालं.. असे म्हणायला हवे. तुम्ही ५००० धावा केल्यानंतर स्वतः थांबायला हवं. आता तुम्ही इतरांनाही खेळण्याची संधी द्यायला हवी.''

कोहलीने आयपीएलमध्ये २०७ सामन्यांत ६२८३ धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आयपीएलमध्ये ५१६२ धावा आहेत. २०१८पासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या लोकेशच्या नावावर ३२७३ धावा आहेत आणि पुढील ३-४ पर्वात तोही ५००० धावांचा टप्पा ओलांडेल अशी आशा आहे.   

टॅग्स :आयपीएल २०२२लोकेश राहुलविराट कोहलीएबी डिव्हिलियर्स
Open in App