मैं पल दो पल का शायर हूॅं... संध्याकाळचे ७ वाजून २९ मिनिटे, क्रिकेटविश्वाने काढली आठवण आपल्या लाडक्या कर्णधाराची 

mahendra singh dhoni and suresh raina : रविवारी या दोन्ही क्रिकेटपटूंच्या निवृत्तीला एक वर्ष पूर्ण झाले आणि यानिमित्तानेच पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींनी आपल्या लाडक्या ‘थाला’ धोनी आणि ‘चिना थाला’ रैना यांची आठवण काढली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:14 AM2021-08-16T05:14:26+5:302021-08-16T05:22:31+5:30

Why am I a shire for a moment ... 7:29 pm, the world of cricket remembers its beloved captain | मैं पल दो पल का शायर हूॅं... संध्याकाळचे ७ वाजून २९ मिनिटे, क्रिकेटविश्वाने काढली आठवण आपल्या लाडक्या कर्णधाराची 

मैं पल दो पल का शायर हूॅं... संध्याकाळचे ७ वाजून २९ मिनिटे, क्रिकेटविश्वाने काढली आठवण आपल्या लाडक्या कर्णधाराची 

Next

मुंबई : गेल्या वर्षीचा १५ ऑगस्ट भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी भावनिक ठरला. संपूर्ण देशात दिवसभर स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा झाल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता एक धक्कादायक वृत्त सगळीकडे पसरले ते दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीचे. धोनीने ७ वाजून २९ मिनिटांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून आपल्या निवृत्तीची माहिती दिली आणि काही वेळाने स्टार फलंदाज सुरेश रैना यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रविवारी या दोन्ही क्रिकेटपटूंच्या निवृत्तीला एक वर्ष पूर्ण झाले आणि यानिमित्तानेच पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींनी आपल्या लाडक्या ‘थाला’ धोनी आणि ‘चिना थाला’ रैना यांची आठवण काढली.

धोनीने जेव्हा निवृत्तीची माहिती दिली, तेव्हा कोणालाही यावर विश्वास ठेवणे सोपे गेले नव्हते. २०१४ सालच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरू असतानाच धोनीने अचानकपणे कसोटीतून निवृत्ती घेतली होती. गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत धोनीने आपल्या चाहत्यांसाठी संदेश लिहिला होता की, ‘तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ वाजल्यापासून तुम्ही मला निवृत्त समजा.’ 

या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘मै पल दो पल का शायर हू’ हे अत्यंत गाजलेले बॉलिवूड गाणं वाजत होते. तसेच या व्हिडीओमध्ये २०१९ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनी धावबाद झाल्याच्या फोटोसह, भारतीय संघासोबतच्या संस्मरणीय क्षणांचे फोटोही समाविष्ट होते. 

आता लक्ष्य आयपीएलकडे  
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार आहे. त्यामुळेच आता पुढील महिन्यापासून यूएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएलसाठी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ताणली गेली आहे. 

रैनानेही दिला होता धक्का! 
गेल्या वर्षी अचानकपणे निवृत्ती घेत धोनीने दिलेल्या धक्क्यातून क्रिकेटप्रेमी सावरलेही नसताना काही वेळाने स्टार फलंदाज सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर करत सर्वांना आणखी एक धक्का दिला. 
त्यानेही इन्स्टाग्रामवर धोनीला टॅग करत सांगितले की, ‘तुझ्यासोबत खेळताना खूप आनंद घेतला. मी यापुढेही तुझ्यासोबत हा प्रवास करू इच्छितो. धन्यवाद भारत. 
 जय हिंद.’ रैनाने भारतासाठी २२६ एकदिवसीय सामन्यांतून ५,६१५ धावा काढताना ५ शतके ठोकली आहेत. 
शिवाय ७८ टी-२० सामन्यांतून एका शतकासह १६०५ धावा केल्या आहेत. त्याने १८ कसोटी सामन्यांमध्ये एका शतकासह ७६८ धावा केल्या.

धोनीची कारकीर्द 

कसोटी
सामने     ९०
धावा     ४,८७६ 
शतके     ६
अर्धशतके ३३ 
सर्वोच्च     २२४
एकदिवसीय
सामने     ३५०
धावा      १०,७७३ 
शतके     १०
अर्धशतके ७३ 
सर्वोच्च     १८३* 
टी-२० 
आंतरराष्ट्रीय
सामने     ९८
धावा     १,६१७
अर्धशतके २
सर्वोच्च     ५६

Web Title: Why am I a shire for a moment ... 7:29 pm, the world of cricket remembers its beloved captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app