Join us  

एकाच दिवशी दोन अर्धशतके झळकावणारा क्रिकेटपटू कोण? केबीसीमध्ये विचारला सात कोटींसाठी प्रश्न

हा प्रश्न विचारल्यावर नेमके काय झाले ते जाणून घेऊया...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 12:16 PM

Open in App

मुंबई : केबीसीच्या अकराव्या हंगामात क्रिकेटबाबत एक प्रश्न विचारला गेला. एकाच दिवसात दोन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये कोणत्या क्रिकेटपटूने शतक झळकावले आहे, हा प्रश्न तब्बल सात कोटी रुपयांसाठी होता. हा प्रश्न विचारल्यावर नेमके काय झाले ते जाणून घेऊया...

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एकाच दिवसात दोन ट्वेन्टी-२० सामने खेळले गेले होते का? तर या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. त्यानंतर आता तुम्ही विचार करत असाल की, एकाच दिवसात दोन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये दोन अर्धशतके कोणी लगावली असतील...

तुम्हालाही आम्ही आता केबीसीसारखे चार पर्याय देतो आहोत. अ. नवरोझ मंगल, ब. मोहम्मद हफिझ, क. मोहम्मद शेहझाद आणि ड. शकिब अल हसन. आता हे चार पर्याय तुमच्यासमोर आल्यावर तुम्ही चक्रावला असाल. विचार करत असाल. पण हा प्रश्न विचारल्यावर केबीसीमध्ये नेमके झाले तरी काय, जाणून घेऊया...

केबीसीचे अँकर, बिग बी अमिताभ बच्चन यांनी सात कोटी रुपयांसाठी हा प्रश्न अजित कुमार यांना विचारला होता. या प्रश्नावर अजित यांनी बराच विचार केला. या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर अजित यांना सात कोटी रुपये जिंकता येणार होते. अजित यांनी यावेळी काय उत्तर दिले, जाणून घेऊया...

अजित यांनी यावेळी पहिला पर्याय निवडत नवरोझ मंगलचे नाव घेतले. अमिताभ यांनी हा पर्याय लॉक करायचा का विचारल्यावर अजित यांनी होकार दिला. पण हे उत्तर चुकीचे निघाले. चुकीचे उत्तर दिल्यामुळे अजित यांना एक कोटी रुपयांवर समाधान मानावे लागले. आता योग्य उत्तर नेमके काय, याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल...

या प्रश्नाचे योग्य उत्तर होते, मोहम्मद शेहझाद. एकाच दिवसांत झालेल्या दोन सामन्यांमध्ये शेहझादने दोन अर्धशतके झळकावली होती. शेहझादने पहिल्यांदा ओमानविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. डेझर्ट टी-२० चॅलेंज स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आयर्लंडविरुद्ध शेहझादने दुसरे अर्धशतक झळकावले होते.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीटी-२० क्रिकेट