Join us  

जेथे असू तेथून मतदान करता यावे!, क्रिकेटपटूंसाठी रविचंद्रन आश्विनने मागितली परवानगी

आश्विन चेन्नईचा आहे; परंतु आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 5:58 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘देशातील विविध ठिकाणी आयपीएल सामन्यात सहभागी होणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना आगामी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान ते जेथे असतील तेथे त्यांना त्यांच्या लोकसभा स्थळासाठी मतदान करण्यास मान्यता द्यायला हवी,’ असे मत भारताचा आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने सोमवारी व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्विनसह शिखर धवन, दीपा कर्माकर, हिमा दास व साक्षी मलिक यांच्यासह अनेक खेळाडूंना टिष्ट्वटरवर टॅग करताना त्यांना जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची विनंती केल्यानंतर आश्विनने असा आग्रह केला. त्याने मोदी यांच्या टष्ट्वीटला उत्तर देताना लिहिले की, ‘मी नरेंद्र मोदी सर यांना विनंती करतो की, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूला तो जेथे कोठे आहे तेथून त्याला मतदान करण्याची मान्यता दिली जावी.’ लोकसभेसाठी निवडणुका ११ एप्रिल ते १९ मेदरम्यान सात टप्प्यांत होत आहेत. आश्विन चेन्नईचा आहे; परंतु आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो.

टॅग्स :आयपीएल 2019लोकसभा निवडणूक