Join us  

वीरेंद्र सेहवागनं पाकिस्तानी गोलंदाजाची केलेली धुलाई, 2 चेंडूंत चोपलेल्या 21 धावा, Video

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या आक्रमक फटकेबाजीनं ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 3:46 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या आक्रमक फटकेबाजीनं ओळखला जातो. सेट होण्यासाठी वेळ घेणं, हे त्याला माहितच नाही आणि म्हणूनच पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर हल्लाबोल करण्याची त्याची स्टाईल सर्वांना आवडायची. पण, सेहवाग तितकाच बेभरवशाचाही होता. त्याचा दिवस असेल तर प्रतिस्पर्धींचं काही खरं नसायचं, पण तो दिवस कधी येईल याची गॅरंटी कोणालाच देता येत नव्हती. अगदी त्यालाही. सेहवागनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या, धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानी गोलंदाजानांही त्याच्या कहरचा सामना करावा लागला. त्यानं त्यानं 2 चेंडूंत 21 धावा चोपण्याचा पराक्रम केला होता.

13 मार्च 2004 ची ही गोष्ट आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वन डे सामन्यात सेहवागनं पाकिस्तानी गोलंदाज राणा नावेद-उल-हसन याच्या दोन चेंडूंवर 21 धावा कुटल्या होत्या. या सर्व धावा सेहवागच्या बॅटीतून आल्या नाही, परंतु भारताच्या माजी कर्णधारानं दहशत निर्माण केली होती की पाक गोलंदाज सैरभैर झाला. त्यामुळेच त्याच्याकडून चुकांवर चुका झाल्या. त्या सामन्याच्या 11व्या षटकात राणा नावेदनं नो बॉलनं सुरूवात केली आणि सेहवागनं त्या चेंडूवर चौकार खेचला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर पुन्हा एक चौकार खेचला आणि तोही चेंडू नो बॉल होता. नावेद राणानं सलग तिसरा चेंडूही नो बॉल टाकला. चौथा चेंडू योग्य पडला अन् सेहवागला त्यावर धाव घेता आली नाही.

पण, पुढचाच चेंडू नो बॉल अन् सेहवागचा चौकार... पुन्हा एक नो बॉल व सेहवागचा प्रहार.. नावेद राणाच्या दोन चेंडूवर 21 धावा आल्या आणि त्यापैकी 16 धाव या सेहवागच्या बॅटीतून तर 5 धावा या नो बॉलमुळे आल्या. त्या षटकाच्या उर्वरित तीन चेंडुंवर तीन धावा आल्या. त्या षटकात सेहवागनं 24 धावा कुटल्या.                       

पाहा व्हिडीओ..

टॅग्स :विरेंद्र सेहवागभारत विरुद्ध पाकिस्तान