Join us  

जसप्रीत बुमरा जेव्हा अर्धा स्टम्प तोडतो तेव्हा...; पाहा वायरल फोटो

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा सध्या भारतीय संघात नाही. त्याचबरोबर बुमरा हा शांत व्यक्ती आहे. त्यामुळे ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 2:22 PM

Open in App

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा सध्या भारतीय संघात नाही. त्याचबरोबर बुमरा हा शांत व्यक्ती आहे. त्यामुळे तो स्टम्प वैगेरे तोडेल, असे वाटत नाही. पण बुमराने अर्धा स्टम्प तोडल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. पण नेमकं बुमराने केले तरी काय, हे आता तुम्हाला समजून घेण्याची उत्सुकता असेल.

आतापर्यंत बऱ्याचदा स्टम्प तोडले गेले आहे. गल्ली क्रिकेटमध्ये तर काही वाद विवाद झाला तर राग बऱ्याचदा स्टम्पपवर निघतो. पण बुमराने कोणाचा राग या स्टम्पवर काढला आहे, हे मात्र कळत नाही.

बुमरा सध्या दुखापतीतून सावरत आहे. यावर्षी त्याला एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता येणार नाही. या गोष्टीचे वाईट बुमराला नक्कीच वाटत असणार. पण आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळण्याचे ध्येय बुमराने आपल्यापुढे ठेवले आहे. त्यामुळे बुमरा सध्या सराव करत आहे. या सरावादरम्यान गोलंदाजी करत असताना बुमराने एक स्टम्प तोडला आहे. या अर्ध्या तुटलेल्या स्टम्पचा फोटो बुमराने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या प्रमुख गोलंदाजांनी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका गाजवली. मर्यादित षटकांच्या सामन्यातही भारतीय संघात अनेक पर्याय आहेत आणि भुवनेश्वर कुमार फिट झाल्यामुळे त्याला अनुभवाची जोड मिळाली आहे. पण, सर्वांचे लक्ष लागले आहे ते जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाकडे. 2019मध्ये त्याचे पुनरागमन होणार नव्हतेच, परंतु ते 2020च्या सुरूवातीला टीम इंडियात परतेल, असा विश्वास होता. पण, तो अजूनही पूर्णपणे बरा झाला नसून त्याचे पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या वक्तव्यानं तसा सूचक इशारा मिळत आहे. 

 

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला सुरू होण्यासाठी एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्ये गेला होता, पण त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला होता. त्यानंतर मायदेशात परतलेला बुमराह तंदुरुस्तीसाठी कसून सराव करत आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. ही मालिका जानेवारीत होणार आहे. पण, प्रसाद यांच्या माहितीनुसार बुमराहचं पुनरागमन लांबणीवर पडले आहे. 

 

डिसेंबरमध्ये विंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका हे संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. यापैकी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत बुमराह खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथे दोन कसोटी, पाच ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत. बुमराह या दौऱ्यातून टीम इंडियात कमबॅक करेल, असा विश्वास प्रसाद यांनी बोलून दाखवला. 

 

टॅग्स :जसप्रित बुमराह