Join us

कर्णधार सुट्टीवर असताना मुलं अशीच मस्ती करतात; रिषभ पंतच्या व्हिडीओवरून महिला क्रिकेटपटूची फिरकी

तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभनं सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 

By स्वदेश घाणेकर | Updated: January 6, 2021 11:42 IST

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पत्नी अनुष्काच्या पहिल्या बाळंतपणासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मायदेशात परतला आहे. विराटनं पहिल्या कसोटीनंतर BCCIकडे सुट्टी मागितली होती आणि ती मंजूर करण्यात आली. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळत आहे. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. अजिंक्यनं दुसऱ्या कसोटीत रिषभ पंतला ( Rishabh Pant) संधी दिली, परंतु त्याला छाप पाडता आली नाही. दरम्यान, तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभनं सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 

या व्हिडीओत रिषभ बॅक फ्लिप मारताना दिसत आहे. त्यावरून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू अॅलेक्स हार्टली ( Alexandra Hartley) हीनं रिषभची फिरकी घेतली. कॅप्टन सुट्टीवर असताना मुलं अशीच खेळणार, विराट कोहलीला बॅक फ्लिप करताना पाहायला आवडेल, असं तिनं ट्विट केलं. तिच्या या ट्विटला खूपच पसंती मिळत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारिषभ पंतविराट कोहली