केव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...

केपी आणि विराट हे 2009आणि 2010च्या आयपीएल सत्रात आरसीबीकडून एकत्र खेळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 11:12 AM2020-04-03T11:12:54+5:302020-04-03T11:21:03+5:30

whatsapp join usJoin us
When 'boss' Anushka Sharma interrupted Virat Kohli's chat with Kevin Pietersen svg | केव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...

केव्हीन पीटरसन-विराट कोहलीची चर्चा सुरू असताना अनुष्कानं ऑर्डर सोडली अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात गुरुवारी इंस्टाग्राम लाईव्हवरून संवाद झाला. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यानं या दोघांनी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर केला. कोहली आणि पीटरसन हे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून एकत्र खेळले आहेत आणि दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. पण, या दोघांची चर्चा रंगात आली असताना पत्नी अनुष्का शर्माचा फतवा येताच विराटची कशी तारांबळ उडते, ते पाहूया...

केपी आणि विराट हे 2009आणि 2010च्या आयपीएल सत्रात आरसीबीकडून एकत्र खेळले. त्यानंतर 2012 मध्ये केपी दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आताचा दिल्ली कॅपिटल्स) संघाचा सदस्य झाला. त्यामुळे गुरुवारी रंगलेल्या चर्चेत केपी आणि विराटनं जुन्या आठवणींना उजाळा दिला. कोहलीनं यावेळी त्याच्या डाएटबद्दल चर्चा केली.  या दोघांची चर्चा ऐन भरात असताना विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने एक फतवा सोडला. त्यानंतर केपी आणि विराटला चर्चा थांबवावी लागली. अनुष्काचा हा फतवा केपीनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

अनुष्कानं कमेंट पोस्ट केली की,'' चला जेवणाची वेळ झाली आहे.'' त्यावर केपीनं लिहिलं की,'' जेव्हा बॉसची ऑर्डर येते तेव्हा ऐकावं लागतंच... आशा करतो की आजचा संवाद चांगला झाला.'' 


लॉकडाऊनच्या या काळात कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळत असल्याचं विराटनं सांगितलं. 2017मध्ये विराट-अनुष्काचं लग्न झालं, परंतु व्यग्र वेळापत्रकामुळे दोघांना एकमेकांना फार कमी वेळ देता आला. पण, आता लॉकडाऊनमुळे दोघंही घरातच आहेत आणि एकमेकांना पुरेसा वेळ देत आहेत. ''लग्नानंतर आम्ही एकमेकांना दिलेला हा सर्वात जास्त वेळ आहे. आम्ही यापूर्वी एका ठिकाणी एवढा वेळ एकत्र कधीच घालवला नाही. या वेळेत सकारात्मक विचार करायला हवा,'' असे विराटनं सांगितले.  

Web Title: When 'boss' Anushka Sharma interrupted Virat Kohli's chat with Kevin Pietersen svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.